कचराकोंडी होणार ? दंडात्मक कारवाईनंतर महापालिकेचा पुणेकरांना 'हा' कठोर इशारा

पुण्यातील कचरा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. कचऱ्याप्रश्नी पुणे महापालिकेनंही कठोर पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 4, 2019 02:32 PM IST

कचराकोंडी होणार ? दंडात्मक कारवाईनंतर महापालिकेचा पुणेकरांना 'हा' कठोर इशारा

पुणे, 4 जून : पुण्यातील कचरा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. कचऱ्याप्रश्नी पुणे महापालिकेनंही कठोर पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. कचरा वर्गीकरण न करणाऱ्या 81 सोसायट्यांवर महापालिकेनं दंडात्मक कारवाई केली आहे. तसंच जर तीन वेळा ही कारवाई करण्यात आली तर त्या सोसायटींचा कचराच न उचलण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतला आहे. त्यामुळे आता कचऱ्याचं वर्गीकरण न करणं पुणेकरांना चांगलंच महागात पडू शकतं. ओल्या कचऱ्यांच्या वर्गीकरण प्रक्रियेची काटेकोर अंमलबजावणी योग्य रितीनं होत आहे की नाही? याची तपासणी करण्याचा निर्णय महापालिकेकडून करण्यात आला होता. सोसायट्यांवर दंडात्मक कारवाई करण्यापूर्वी जनजागृतीचा उपक्रमदेखील राबवण्यात आला होता.

(पाहा : VIDEO: 'मुस्लीम मतांची साथ न मिळाल्यानं वंचित बहुजन आघाडीला मोठा फटका')

यानुसार, सोसायट्यांमधील कचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबतची पाहणी केल्यानंतरच महापालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. यादरम्यान, कचरा वर्गीकरण न करणाऱ्या 81 सोसायट्यांवर सुरुवातीस नोटीस बजावण्यात आली आणि त्यानंतर दंडात्मक कारवाई केली गेली.

(पाहा :SPECIAL REPORT: जीव मुठीत घेऊन हंडाभर पाण्यासाठी महिलांची कसरत)

SPECIAL REPORT: हिंदी भाषेच्या सक्तीवरून सरकारचा यूटर्न?

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 4, 2019 02:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...