VIDEO : मराठा आंदोलनात नांगरे पाटलांची एंट्री, तरुण पडला पाया !

News18 Lokmat | Updated On: Jul 30, 2018 08:24 PM IST

VIDEO : मराठा आंदोलनात नांगरे पाटलांची एंट्री, तरुण पडला पाया !

30 जुलै : पुण्यात चाकण परिसरात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले. संतप्त जमावाने 100 हुन अधिक गाड्यांची तोडफोड केली. या संतप्त जमावात विश्वास नांगरे पाटील थेट आंदोलनात घुसले. आंदोलनात जाऊन त्यांनी आंदोलकांशी संवाद साधला आणि शांत राहण्याचं आवाहन केलं. यावेळी मराठा तरुणाने विश्वास नांगरे पाटील यांच्या पाया पडला.

प्रत्येक जातीला पोट असतं, पण पोटाला जात लावू नका - उद्धव ठाकरे

पुण्यात चाकण परिसरात आंदोलकांनी जबरदस्त तोडफोड केली आहे. तब्बल 100 ते 150 गाड्या आंदोलकांनी फोडल्या आहे.  चाकण जवळच्या तळेगाव चौकात आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी दिसेल त्या गाड्या पेटवून दिल्या आहे. यात मोठ्या प्रमाणात खासगी गाड्यांचा समावेश आहे. तर एसटी बसेसलाही आंदोलकांनी आग लावली आहे. काही बसेस तर जळून खाक झाल्या आहेत. खेड, चाकण आणि एमआयडीसी परिसरातील आंदोलकांनी हे तीव्र आंदोलन केलं आहे. चाकण परिसरात जमावबंदी लागू करण्यात आलीये.

चाकणमध्ये तणावपूर्ण शांतता; जमावबंदी लागू

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतलीये. सर्व आमदारांनी सामूहिक राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. तसंच काँग्रेसचे आमदार राज्यपाल यांच्या भेट घेण्यासाठी गेले आहे. मराठा आरक्षणासाठी काँग्रेसचे आमदार विशेष अधिवेशनाची मागणी करणार आहे. याआधीही काँग्रेसचे आमदार पंढरपूर-मंगळवेढाचे काँग्रेसचे आमदार भारत तुकाराम भालके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 30, 2018 05:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...