S M L

हाॅटेलमध्ये फुकट खाणाऱ्या गुंडाला तुकडे करून जाळलं,10 महिन्यांपूर्वीच्या हत्येचा उलगडा

विकी पोताण असं खून झालेल्या व्यक्तीच नाव असून १० महिन्यांपूर्वीचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

Sachin Salve | Updated On: Oct 31, 2017 06:22 PM IST

हाॅटेलमध्ये फुकट खाणाऱ्या गुंडाला तुकडे करून जाळलं,10 महिन्यांपूर्वीच्या हत्येचा उलगडा

वैभव सोनवणे,पुणे

31 आॅक्टोबर : हॉटेलमध्ये फुकट जेवण करून दमदाटी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराचे तुकडे करून जाळल्याचा धक्कादायक प्रकरण पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिटने उघडकीस आणलंय. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आलीये. विकी पोताण असं खून झालेल्या व्यक्तीच नाव असून १० महिन्यांपूर्वीचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

पुण्यातील बी टी कवडे रोडवर दरोडा टाकण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावेळी पोलिसांनी सापळा रचून पाच आरोपीना ताब्यात घेतलंय. त्यांच्या तपास केला असता विकी रमेश पोताण या सराईत गुन्हेगाराचा काही महिन्यांपूर्वी खून करण्याच्या गुन्ह्यात या सर्वांचा हात असल्याचं तपासात उघड झाले आहे.



याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिटने पाच आरोपींना अटक केली आहे. विक्रम पिल्ले,राजू नाईक,संभू थापा,फारुख शेख,शाहरुख शेख असं अटक केलेल्या आरोपीची नावं आहेत. यामधील आरोपी विक्रम पिल्ले याच्या चायनीज गाड्यावर येऊन पैश्याची मागणी करत होता फुकट जेवण करत होता. त्यातूनच त्याचा खून करण्यात आला.

खून झालेल्या विकीवर पाच गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी आरोपीकडून एअर गन,चार कोयते,मास्क,दोरी,मोबाईल असा 18 हजार 300 चा माल जप्त केला आहे. त्यामुळे आता पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेतला मुख्य आरोपी विकी पिल्ले हा आंतरराष्ट्रीय घोडेस्वार म्हणून काम करत होता. मात्र गेले दोन वर्ष पुण्यातल्या वानवडी परिसरात तो चायनीजचा स्टॉल लाऊन उपजीविका करत होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 31, 2017 06:22 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close