ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पुरंदरे यांचं निधन

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पुरंदरे यांचं निधन

निर्मला पुरंदरे यांनी वनस्थळी या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांच्या सबलीकरणासाठी काम केलं.

  • Share this:

पुणे, 20 जुलै : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मलाताई पुरंदरे यांचं आज निधन झालं. त्या 86 वर्षांच्या होत्या. वृद्धपकाळ आणि आजारपणाने त्यांचं निधन झालं. आज संध्याकाळी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

निर्मला पुरंदरे यांनी वनस्थळी या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांच्या सबलीकरणासाठी काम केलं. १९८१ ला त्यांनी वनस्थळी या संस्थेची स्थापना करुन महिलांचं आरोग्य, त्यांचं शिक्षण आणि रोजगारासाठीच प्रशिक्षण यासाठी काम सुरू केलं. सामाजिक काम करताना त्यांनी विविध विषयांवर लेखन देखील केलं. स्नेहयात्रा हे त्यांच प्रवासवर्णन प्रसिद्ध आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी असूनही त्यांनी आयुष्यभर स्वत:चं वेगळं व्यक्तिमत्व आणि लेखन शैली जोपासली होती.

====================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 20, 2019 11:50 PM IST

ताज्या बातम्या