शरद पवार म्हणतात, 'राष्ट्रपतीपद नको रे बाबा'

"एखादा नेता राष्ट्रपती झाला तर त्यानंतर तो निवृत्त होत असतो, आपल्या काही निवृत्त व्हायचं नाही. शेवटपर्यंत लोकांच्यामध्ये राहुन काम करायचंय"

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 30, 2017 06:11 PM IST

शरद पवार म्हणतात, 'राष्ट्रपतीपद नको रे बाबा'

30 डिसेंबर : एखादा नेता राष्ट्रपती झाला तर त्यानंतर तो निवृत्त होत असतो. त्यामुळे आपल्याला त्या रस्त्याला जायचंच नाही असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रपतींपदाच्या चर्चेला पूर्णविराम दिलाय.

राजकीय क्षेत्रात पन्नास वर्षांची यशस्वी कारकीर्द पूर्ण केल्याबद्दल भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा पुण्यात शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी शरद पवार देशाचे भावी राष्ट्रपती असतील असं भाकीत वर्तवलंय.

त्यांच्या या वक्तव्यानंतर शरद पवारांनी आपल्या स्टाईलमध्ये राष्ट्रपती होण्यास नकार कळवला. सुशीलकुमार शिंदेंनी मी भावी राष्ट्रपती व्हावं असं बोलून दाखवलं. एखादा नेता राष्ट्रपती झाला तर त्यानंतर तो निवृत्त होत असतो, आपल्या काही निवृत्त व्हायचं नाही. शेवटपर्यंत लोकांच्यामध्ये राहुन काम करायचं असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.

तसंच एखादा नेता राज्यपाल आणि राष्ट्रपती झाल्यानंतर निवृत्त होत असतो. पण सुशीलकुमार शिंदे त्याला अपवाद ठरले. राज्यपाल झाल्यानंतर सुशीलकुमार शिंदे हे गृहमंत्रीही झाले होते. त्यामुळे त्यांच्या इतकी उडी मला जमणार नाही. म्हणून त्या रस्त्याला जायलाच मी तयार नाही असं म्हणत शरद पवारांनी सुशीलकुमार शिंदेंना कोपरखळी लगावली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 30, 2017 06:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...