S M L

शरद पवार आणि नितीन गडकरींच्या भेटीचं हे होतं कारण...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची पुण्यात भेट झालीये.

Sachin Salve | Updated On: Jun 1, 2018 07:00 PM IST

शरद पवार आणि नितीन गडकरींच्या भेटीचं हे होतं कारण...

पुणे, 01 जून : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची पुण्यात भेट झालीये. या दोन्ही नेत्यांमध्ये पंचतारांकीत हाॅटेलमध्ये 30 मिनिटं चर्चा झाली.

पुण्यात आज नितीन गडकरी आणि शरद पवार यांची जेडब्ल्यू मॅरिअट पंचतारांकीत हॉटेलमध्ये भेट झाली. दुपारच्या सुमारास ही भेट झाली. शरद पवार हे बारामतीत होते. नितीन गडकरी जेव्हा पुण्यात पोहोचले तेव्हा शरद पवार हे बारामतीहुन गडकरींची भेट घेण्यासाठी पुण्यात पोहोचले. नागपूरमधील मेट्रो ब्राॅडगेजचा आढावा घेण्यासाठी भेट घेतल्याचं सांगितलं जातंय.

पण, आठवड्याभरापुर्वीच नितीन गडकरींनी पुण्यात काॅन्सिल हाॅलमध्ये बैठक घेतली होती. या बैठकीला शरद पवार सुद्धा उपस्थितीत होते. त्यामुळे अचानक आठ दिवसांनंतर कोणतीही सुरक्षा न घेता शरद पवार हे नितीन गडकरींच्या भेटीसाठी पुण्यात आले. या बैठकीला सहकार मंत्री सुभाष देशमुखही हजर होते.

दरम्यान, शरद पवार आणि नितीन गडकरी हे नॅशनल हेवी इंजिनियरिंग संस्थेच्या बैठकीच्या निमित्ताने आज एकत्र आले होते. दोन मोठ्या पक्षाचे नेते एकत्र आले त्यामुळे राजकीय वर्तृळात चर्चा होणे साहजिक आहे. या बैठकीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी दिली. मात्र, शरद पवार पुण्यात येतील हे आम्हालाही माहिती नव्हते असंही अंकुश काकडेंनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 1, 2018 04:47 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close