पुण्यात शास्त्रज्ञांचा मोर्चा

पुण्यात शास्त्रज्ञांचा मोर्चा

या मोर्च्यामधून वैज्ञानिक दृष्टिकोन जपला जावा, विज्ञान संशोधनासाठी केंद्र सरकारने भरीव निधी द्यावा अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत.

  • Share this:

हलिमा कुरेशी,पुणे

पुणे, 9 ऑगस्ट: वैज्ञानिक दृष्टीकोन समाजात रूजावा म्हणून पुण्यात आज शास्त्रज्ञांनी सायन्स मार्च काढला. या मोर्च्यामधून वैज्ञानिक दृष्टिकोन जपला जावा, विज्ञान संशोधनासाठी केंद्र सरकारने भरीव निधी द्यावा अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत.

पुण्यातील एन.सी.एल, आयसरसारख्या अनेक वैज्ञानिक संस्था आणि अंनिसचे हमीद दाभोळकर या मार्चमध्ये सहभागी झाले होते. फलज्योतिषाला विज्ञानाच्या यादीत समाविष्ट केलं जात असून विद्यापीठात शिकवलं जाणार आहे, यासंदर्भात ज्येष्ठ गणिततज्ज्ञ मंगला नारळीकर यांनी दु:ख व्यक्त केलं. आयुकाचे माजी संचालक डॉ.नरेश दधीची यांनीही जागतिक पातळीवर झालेल्या या सायन्स मार्चमध्ये सहभाग नोंदवला होता. विज्ञानासाठी मोर्चा, मानवतेसाठी मोर्चा असे फलक घेऊन संशोधक, शास्त्रज्ञ या मोर्चात सहभागी झाले होते. पुणे स्टेशन येथील महात्मा गांधींच्या पुतळ्यापासून ससून रुग्णालयाजवळील आंबेडकर पुतळ्यापर्यंत हा मार्च काढण्यात आला.

'विवेकवादी विचारांसाठी शास्त्रज्ञ काम करत असतात. त्यांनाही यासाठी रस्त्यावर यावं लागत आहे. डॉ नरेंद्र दाभोळकर आणि जयंत नारळीकर यांनी फलज्योतिषाला आव्हान दिलं होतं' असं हमीद दाभोळकर म्हणाले. तर केंद्र शासनाने वैज्ञानिक संशोधनासाठी एकूण जीडीपीच्या किमान 2 टक्के तरी तरतूद करायला हवी अशी अपेक्षा ज्येष्ठ शास्त्रज्ञ मंगला नारळीकर यांनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 9, 2017 10:44 PM IST

ताज्या बातम्या