पुण्यातील साडी सेंटर आगीत भस्मसात; अंगावर शहारे आणणारे PHOTO
पुण्यात साडी सेंटरला लागलेल्या आगीत 5 कामगारांचा मृत्यू झाला आहे. कामगार साखर झोपेत असताना ही आग लागली.

पुणे शहरातील उरळी देवाची येथील राजयोग साडी सेंटर नावाच्या दुकानात भीषण आग लागली. पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास ही भीषण आग लागली.

ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळेस दुकानात पाच कामगार होते. पाचही कामगार साखरझोपेत असताना दुकानाला आग लागली.

या अग्नितांडवात पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला.

पाचही कामगारांचे मृतदेह दुकानाबाहेर काढण्यात आले आहेत. दरम्यान, ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली? याबाबतची ठोस माहिती मिळालेली नाही.

कामगारांचे मृतदेह बाहेर काढले असून त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेतला जात आहे.
First Published: May 9, 2019 11:49 AM IST