जुगार अड्ड्यावरच वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने मांडला डाव, पोलिसांनी केली अटक

विजय जाधव हा बारामती शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ निरीक्षक आहेत. क्लब चालक माजी नगरसेवक अविनाश जाधवसह ४१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 9, 2017 08:32 PM IST

जुगार अड्ड्यावरच वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने मांडला डाव, पोलिसांनी केली अटक

09 डिसेंबर : पुण्यात जुगार खेळताना सापडलेल्या एका पोलिसाला अटक करण्यात आलीये. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव असं या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.  मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

विजय जाधव हा बारामती शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ निरीक्षक आहेत. क्लब चालक माजी नगरसेवक अविनाश जाधवसह ४१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त डॉ प्रवीण मुंडे आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केली.

मुंढवा परिसरात कपिल मॅट्रिक्स इमारतीमध्ये असणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर काल मध्यरात्री धाड टाकण्यात आली. या ठिकाणावरून ७ लाखांची रोकड, ४ चारचाकी आणि दुचाकी, टीव्ही असा जवळपास १ कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, अप्पर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दोनचे उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे आणि त्यांच्या पथकाने केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 9, 2017 08:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...