News18 Lokmat

हिंदी व मल्याळम अभिनेत्रींकडून पुण्यात देहविक्री, वयोवृद्ध डॉक्टर दलालही अटकेत

हिंदी व मल्याळम अभिनेत्रींना देहविक्री करताना पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पोलिसांनी रंगेहात पकडले. तसेच पोलिसांनी एका वयोवृद्ध दलालालाही अटक केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 1, 2019 11:51 AM IST

हिंदी व मल्याळम अभिनेत्रींकडून पुण्यात देहविक्री, वयोवृद्ध डॉक्टर दलालही अटकेत

पुणे, 1 जून- हिंदी व मल्याळम अभिनेत्रींना देहविक्री करताना पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पोलिसांनी रंगेहात पकडले. तसेच पोलिसांनी एका वयोवृद्ध दलालाही अटक केली आहे. डॉ.सुरेश कुमार सूद (वय-74, रा. 108, किंग्ज अपार्टमेंट, मीरा रोड, ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमधील निवृत्त डॉक्टर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोन्ही अभिनेत्रींची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

काय आहे हे प्रकरण?

सामाजिक सुरक्षा विभागाचे फौजदार अनंत व्यवहारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. सुरेश सुद हा दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमधून सेवानिवृत्त झाला आहे. तो मुंबईतील 24 व 25 वर्षांच्या दोन हिंदी आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रींकडून देहविक्री करून घेत असल्याची माहिती मिळाली होती. यावरून बंडगार्डन भागातील मंगलदास रोडवरील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये बनावट ग्राहकद्वारे सापळा रचण्यात आला. नंतर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी फौजदार अनंत व्यवहारे यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश...

दरम्यान, गेल्या आठवड्यात पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील जी. रेसिडेन्सी हॉटेलमध्ये छापा टाकून पोलिसांनी हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. पोलिसांनी इथून मुंबईतील एका तरुणीची सुटका केली आहे. तसेच तरुणीला देहविक्री करण्यास भाग पाडणाऱ्या दोन दलालांना पोलिसांनी अटक केली आहे. अलोक मेहता, गोरख शर्मा अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बहादरपुरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक गणेश माने आणि पथकाने ही कारवाई केली. संबंधित तरुणी गरीब घरातील असून आरोपींनी तिला पैशाचं आमिष दाखवून तिला देहविक्री करण्यास भाग पाडल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

Loading...

VIDEO: उष्माघातानं 3 दिवसांच्या चिमुकलीसह आईचा मृत्यू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 1, 2019 11:51 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...