Elec-widget

पुण्यात शिवरायांच्या पालखीत तलवारधारी,पोलिसांनी घेतलं दोघांना ताब्यात

पुण्यात शिवरायांच्या पालखीत तलवारधारी,पोलिसांनी घेतलं दोघांना ताब्यात

या दिंडीत दोन तलवारी घेऊन धारकरी असल्याचा आक्षेप घेत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय.

  • Share this:

हलिमा कुरेशी, पुणे

20 जून : पुण्यात शिवछत्रपती पालखी दिंडीला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतलंय.  या दिंडीत दोन तलवारी घेऊन धारकरी असल्याचा आक्षेप घेत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय.

२०१५ पासून ही सुरू करण्यात आली. रायगड ते पंढरपूर अशी ही दिंडी असते. डॉ. संदीप महिंद हे या दिंडीचे प्रमुख आहेत. या दिंडीत शिवाजी महाराजांची छोटी मुर्ती, पादुका आणि दोन तलवारी अशी ही दिंडी असते. ३० जण यात सहभागी असतात. तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात ही दिंडी सहभागी होते.

दोन तलवारी असल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय.

अलका चौकात दोन दिवसांपूर्वी संभाजी भिडे गुरुजींच्या धारकरी पथकाला पोलिसांनी मज्जाव करत गुन्हे दाखल केले. याचा आम्हाला फटका बसल्याचं महिंद यांनी आरोप केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 20, 2017 05:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...