पत्नीचीच नग्न छायाचित्रे 'तो' व्हायरल करणार होता..!

पत्नीचीच नग्न छायाचित्रे 'तो' व्हायरल करणार होता..!

मोबाईलवर काढलेले फोटो सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देत नवऱ्यानेच त्याच्या बायकोला ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

पिंपरी, 16 सप्टेंबर : मोबाईलवर काढलेले फोटो सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देत नवऱ्यानेच त्याच्या बायकोला ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहितेने शारिरीक आणि मानसिक छळ केल्याची तक्रार दाखल केल्यानंतर भोसरी एमआयडीसी पोलिसांनी तीच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केलाय.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहितेचा नवरा तीला गोव्याला घेऊन गेला आणि एका हॉटेलमध्ये त्याने तीच्यावर अनैसर्गिक कृत्य केले. एवढ्यावच तो थांबला नाही, तर ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने त्याने तीचे नग्न फोटो काढले आणि ते सोशल मिडियावर व्हायरल करण्याचीही धमकी दिली.

मोटार खरेदी करण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा तीच्या सासऱ्याने लावला होता. नणंददेखील तील शिवीगाळ आणि मारहाण करायची. गोव्यात तीच्यावर अत्याचार केल्यानंतर तीचे संबंध मित्राबरोबर आहेत असे म्हणत पतीने तीच्या चारित्र्यावर संशय घेतल्यानंतर विवाहितेने तिघांविरोधात पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. चारित्र्यावर संशय घेत शरिरीक, मानसिक छळ केल्याप्रकरणी विवाहितेने भोसरी एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार दिली.

पतीने माझा मोबाईल घेऊन मित्राच्या मदतीने माझे नग्न फोटो काढले आणि ते छायाचित्र सोशल मिडियावर अपलोड करण्याची धमकी दिली. माहेरहून पैसे आणण्याचा तगादा त्याने लावला असल्याचेही तीने तक्रारीत म्हटले आहे. विवाहितेच्या तक्रारीवरून भोसरी पोलिसांनी तीचा पती, सासरा आणि नणंद या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 VIDEO : 'दगडूशेठ'चा श्रीगणेशा; तृतीयपंथीयांना मिळाला आरतीचा मान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 16, 2018 06:18 PM IST

ताज्या बातम्या