आईच्या मृत्यूचं दु:ख विसरून मुलाचा अवयवदानाचा निर्णय,पाच जणांना मिळालं नवं आयुष्य!

अवयवदानाच्या या निर्णयामुळे पाच जणांचे प्राण वाचले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Dec 21, 2018 09:30 PM IST

आईच्या मृत्यूचं दु:ख विसरून मुलाचा अवयवदानाचा निर्णय,पाच जणांना मिळालं नवं आयुष्य!

वैभव सोनवणे, पुणे 20 डिसेंबर : वडिलांचा आधार नव्हता, आता आईसुद्धा अचानक गेली. सतरा वर्षांच्या तरूणावर दु:खाचा डोंगर कोसळला. पण अशा दु:खाच्या परिस्थितही त्या तरूणाने आपल्या ब्रेन डेड आईच अववयवदान करण्याचा निर्णय घेतला आणि पाच जणांचे प्राण वाचले. त्या धैर्यशील मुलाचं नाव आहे सुमीत सळके. त्याचा हा निर्णय अनेकांना प्रेरणा देणारा ठरला आहे.


सुमीतच्या आई सुरेखा सळके यांच्या मेंदूत अचानक रक्तस्त्राव झाला आणि त्यांन हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. त्यानंतर डॉक्टरांनी मेंदू मृत झाल्याचं घोषित केलं. सतरा वर्षांच्या सुमीतवर दु:खाचा डोंगर कोसळला. आधी वडिलांचा आधार गेला. त्यात आता आईही सोडून गेल्याने छोट्या बहिणीसोबत त्याला पुढची लढाई लढावी लागणार आहे. एवढा मोठा दु:खाचा डोंगर कोसळल्यानंतर आपल्या आईचे अवयव दान करण्याचा धाडसी निर्णय घेऊन त्याने नवा आदर्श निर्माण केलाय.


खराडी येथील कोलंबिया एशिया हॉस्पिटलमध्ये सुमीतच्या आईंना मागच्या आठवड्यात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्यामुळे त्या बेशुध्द पडल्या होत्या. त्यांना रूग्णालयात आणल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु त्यांच्याकडून उपचारांना काहीच प्रतिसाद येत नव्हता.

Loading...


डॉक्टरांनी मग सुमीतला अवयवदानाचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर त्याने  अवयवदानाचा निर्णय घेतला. एवढ्या लहान वयात त्याने खंबीर राहून हा निर्णय घेतल्यामुळे हॉस्पिटलमधल्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्याचं कौतुक केलं. आई बाबांनी केलेल्या संस्कारामुळेच हा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया सुमीतने व्यक्त केलीय.


पाच रूग्णांना फायदा

सुमीतच्या आईचं ह्रदय, किडनी, डोळे आणि लिव्हर दान करण्यात आलं त्यामुळे पाच रूग्णांना जीवदान मिळालं. केईएम रूग्णालयातील रूग्णाला लिव्हर, हृदय रूबी हॉल क्लिनिकला एक किडनी वॉकहार्ट रूग्णालय (नाशिक), दुसरी किडनी कमांड हॉस्पिटलला आणि डोळ्यांचा कोर्निया एचव्ही देसाई रूग्णालयातील रूग्णाला देण्यात आला.


 

LIVE VIDEO : बघता बघता काही सेकंदात बोट समुद्रात बुडाली, 4 जण झाले बेपत्ता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 21, 2018 07:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...