पुणेकरांच्या हक्काचे 200 कोटी एका क्षणात गायब!

पुणेकरांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. इथल्या नगरसेवकांनी पुणे मनपाच्या तिजोरीत येऊ घातलेले 200 कोटी एका क्षणात नाकारले आहेत.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 30, 2018 02:01 PM IST

पुणेकरांच्या हक्काचे 200 कोटी एका क्षणात गायब!

30 जानेवारी : पुणेकरांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. इथल्या नगरसेवकांनी पुणे मनपाच्या तिजोरीत येऊ घातलेले 200 कोटी एका क्षणात नाकारले आहेत. तुम्ही पुणे मनपा पाहिलीच असेल, बरं तुम्ही पुण्याच्या नगरसेवकांनाही ओळखत असाल पण त्यांना तुम्ही अजून पुरतं ओळखलेलं नाहीये. त्यांचा नवा कारनामा आम्ही तुम्हाला सांगतो. तर, प्रेक्षकहो पुण्याच्या या बहुरंगी नगरसेवकांनी पुणेकरांच्या हक्काचे 200 कोटी नाकारले हो. ते ही एका क्षणात...

विषय होता एका बिल्डरशी संबंधित. आता बिल्डर म्हटलं की राजकारण्यांच्या मनात ओलावा असणारच. झालंही तसंच. सोमवारी पुण्यनगरीच्या या जनसेवकांनी सिंहगड रस्त्यावरचा, अडीच एकरचा, मोक्याच्या भूखंड मूळ मालकाला परत द्यायचा ठराव केला होता. बरं, ठराव केला तो केला, त्यावर एका शब्दानं चर्चा तरी करायची. पण, ते ही नाही. ठराव आला कधी आणि गेला कधी ते सभागृहाच्या भिंतीलाही कळलं नसेल. पुणेकरांनो, जमिनीसाठी राजकारण्यांचा मायेचा ओलावा यालाच म्हणतात का हो?

नगरसेवकांनी या अडीचशे कोटींच्या बाजारमूल्याच्या जमिनीवरचा मनपाच्या मालकी हक्क अगदी सहज सोडला असेल का हो? आम्हाला प्रश्नच पडलाय. कारण, लगोलग पुण्याच्या बाणेदार आयुक्तांची भूमिका पण आता बदललीय हो! नेत्यांचं जमिनीचं आकर्षण कुठं लपलंय? पुणेकरांनो, तुम्हीच ठरवा असलं नेतृत्व तुम्हाला चालतंय का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 30, 2018 02:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...