पुणे महापालिकेने सल्लागारांवर 9 वर्षांत केली 64 कोटींची उधळपट्टी

पुणे महापालिकेने सल्लागारांवर 9 वर्षांत 64 कोटींची उधळपट्टी केल्याची धक्कादायक माहिती नगरसेवकांनी मुख्य सभेला विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल चव्हाट्यावर आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 25, 2019 04:07 PM IST

पुणे महापालिकेने सल्लागारांवर 9 वर्षांत केली 64 कोटींची उधळपट्टी

वैभव सोनवणे,(प्रतिनिधी)

पुणे, 25 जुलै- पुणे महापालिकेने सल्लागारांवर 9 वर्षांत 64 कोटींची उधळपट्टी केल्याची धक्कादायक माहिती नगरसेवकांनी मुख्य सभेला विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल चव्हाट्यावर आली आहे. महापालिकेने अत्यंत किरकोळ कामासाठी हे पैसे खर्च केलेत आणि महत्त्वाचे म्हणजे सत्ताबदल झाल्यावरही सल्लागारावरही उधळपट्टी सुरूच आहे. महापालिका प्रशासनाने 9 वर्षांत सल्लागारांवर तब्बल 64 कोटींपेक्षा अधिक खर्च केला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे अगदी किरकोळ कामांसाठी सल्लागार नेमण्यात आले असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे विकासकामांच्या नावाखाली महापालिकेकडून सल्लागाराचे खिसे भरण्याचा उद्योग अद्यापही सुरूच आहे.

काय आहे हे प्रकरण?

उधळपट्टी सर्वाधिक 33 कोटी 33 लाख रुपयांचा खर्च पथ विभागाकडून करण्यात आला आहे. पथ रस्ता रुंदीकरणापासून नवीन डीपी रस्ते उड्डाणपूल, सिमेंट कॉक्रिटीकरण, पावसाळी पाण्याचे व्यवस्थापन, सायकल आराखडा करणे, अशा कामांसाठी काही विशिष्ट सल्लागारांना सर्वाधिक कामे ड्रेनेज विभागाने 14 कोटी रुपयांचा खर्च सल्लागारांवर केला आहे. त्यामध्ये 11 गावांचा स्टॉर्म वॉटर आराखडा, मैलापाणी यासाठीच्या खर्चाचा समावेश आहे. प्रकल्प विभागाकडून 10 कोटी 64 लाखांचा खर्च झाला आहे. याविभागानेही प्रामुख्याने उड्डाणपूल आणि नदीवरील पुल बांधण्यासाठी सल्लागावर खर्च केला आहे. पाणी पुरवठा विभागाने जवळपास साडेचार कोटी तर घनकचरा व्यवस्थापन विभागाने दीड कोटींच्या जवळपासचा खर्च सल्लागारांवर केला आहे.

या उधळपट्टीत प्रशासनाची सर्व पक्षीय सत्ताधाऱ्यांची साथ मिळत आली आहे. त्यामुळे आधीचे आणि आताचे सत्ताधारी एकमेकांवर आरोप करण्यातच धन्य आहेत, अशी माहिती विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी दिली आहे. महापालिकेकडून सल्लागारांवर एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या प्रत्येक विभागाने जे अभियंते आहेत, त्यांचे नक्की काय काम, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Loading...

VIDEO: महापालिकेचा बेजबाबदारपणा! उघड्या गटारात पडली महिला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 25, 2019 04:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...