पुण्यात नाल्याच्या काठावरील घर कोसळले; एक चिमुकली आणि जनावरे ढिगाऱ्याखाली

पुण्यात नाल्याच्या काठावरील घर कोसळले; एक चिमुकली आणि जनावरे ढिगाऱ्याखाली

पुण्याती मुंढवा केशवनगर भागात शनिवारी सकाळी एक दुर्घटना घडली. नाल्याच्या काठावरील सुभाष भांडवलकर यांचे राहते घर आणि त्याशेजारी अललेला गोठा कोसळला.

  • Share this:

पुणे, ता. २१ जुलै : पुण्याती मुंढवा केशवनगर भागात शनिवारी सकाळी एक दुर्घटना घडली. नाल्याच्या काठावरील सुभाष भांडवलकर यांचे राहते घर आणि त्याशेजारी अललेला गोठा कोसळला. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली ८ व्यक्ती आणि १० ते १५ गायी आणि म्हशी अडकल्या होत्या. पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि ७ जणांना बाहेर काढले. अजुनही या ढिगाऱ्याखाली एक चिमुकली आणि जनावरे अडकली आहेत.

पुण्याच्या मुंढवा केशवनगर भागातून वाहणाऱ्या नाल्याच्या काठावर सुभाष भांडवलकर यांचे घर आहे. गेल्या काही दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे नाला भरून वाहतोय. नाल्याच्या काठावरच असल्याने घराला आणि गोठ्याला ओल आली होती. शनिवारी सकाळी कमकुवत झालेलं बांधकाम पडलं असाव अशी शक्यता व्यक्त केली जातेय. जेसीबीच्या सहाय्याने मलबा हटविण्याचे काम सुरु असले तरी, त्या खाली दबलेल्या जनावरांना काढण्यास अनेक अडचणी येत आहेत. चिमुकलीला काढण्यात अद्याप यश आले नसले तरी शोध कार्य सुरु आहे.

पुन्हा एकदा गो- तस्करीच्या संशयातून मुस्लिम तरुणाचा बळी

विशेष बाब म्हणजे, ११ महिन्यांपूर्विच मुंढवा केशवनगर हा भाग पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालाय. त्यानंतर नाल्याच्या काठांवरील घरे ही धोक्याच्या स्थितीत असल्याच्या नोटिसेस महापालिकेने बजाल्या होत्या ही बाब या घटनेमुळे स्पष्ट झालीय. पुणे महापालिकेत नुकत्याच समाविष्ट झालेल्या भागांमधील धोकादायक इमारतींचे आणि घरांचे सर्वेक्षण हा मुद्दा या दुर्घटनेमुळे ऐरणिवर आला आहे.

हेही वाचा..

जिममध्ये वेट लिफ्टिंग करताना २२ वर्षीय तरुणाला कार्डियाक्ट अरेस्ट

सोलापुरात मराठा समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण,दोन एसटी गाड्यांची तोडफोड

मुख्यमंत्र्याच्या महापूजेला मराठा,धनगर समाजाचा विरोध कायम

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 21, 2018 04:12 PM IST

ताज्या बातम्या