S M L

राज्यात भाजपला पहिला धक्का, सहयोगी खासदार काँग्रेसमध्ये

आज संध्याकाळी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. अशातच भाजपला राज्यात धक्का बसला आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 10, 2019 12:53 PM IST

राज्यात भाजपला पहिला धक्का, सहयोगी खासदार काँग्रेसमध्ये

पुणे, 10 मार्च : आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. कारण आज संध्याकाळी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. अशातच भाजपला राज्यात धक्का बसला आहे. कारण भाजपचे सहयोगी खासदार असलेले संजय काकडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

पुण्यातील नेते आणि राज्यसभा खासदार संजय काकडे हे आधी काँग्रेसचे सहयोगी खासदार होते. पण त्यानंतर त्यांनी भाजपला साथ दिली. आता मात्र ते पुन्हा एकदा स्वगृही येणार असून ते लवकरच काँग्रेसचं प्राथमिक सदस्यत्व स्वीकारणार आहेत.

'जर काँग्रेसने सन्मानाने तिकीट दिलं तर पुण्यातून लोकसभा लढणार', असं काकडे यांनी म्हटलं काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. तसंच भाजपसाठी मी तन- मन-धन दिलं तरी, माझा विचार का होत नाही' अशी खंतही त्यांनी बोलावून दाखवली.


काकडे का झाले भाजपवर नाराज?

न्यूज18 लोकमतशी बोलताना संजय काकडे यांनी काही दिवसांपूर्वी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपकडून आपण लायक उमेदवार असल्याचं सांगितलं होतं. 'पुणे महापालिका निवडणुकीचे गिरीश बापट हे मुळीच शिल्पकार नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत बापट विरुद्ध काकडे हा सामना खरंच व्हावा यासाठी मी उत्सुक आहे', असंही काकडे म्हणाले होते.

'भाजप पक्षासाठी तन-मन-धन दिलं, तरी माझा विचार का होत नाही याचं दुःख आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझा सन्मान राखतील', अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Loading...

संजय काकडे यांनी उघड नाराजी दाखवूनही भाजपकडून लोकसभेचं तिकीटाचं आश्वासन मिळालं नाही. यातूनच मग काकडेंनी भाजपपासून दूर होण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.


VIDEO : कुणी शिव्या घातल्या तर घराबाहेर काढून मारा, राज ठाकरेंचा इशारा



बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 10, 2019 12:38 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close