तुघलकी निर्णय, विद्यार्थिनींनी कोणत्या रंगाची अंतर्वस्त्रे घालावीत हेही ठरवणार शाळा

पुण्यातील MIT विश्वशांती गुरुकुल शाळा वादात सापडली आहे. विद्यार्थिनींनी कोणत्या रंगांची अंतर्वस्त्रे घालावीत या अजब अटीसह कोणत्या वेळी पाणी प्यावं, कोणत्या वेळी लघवीला जावं, हेही शाळेच्या रजिस्टरमध्ये नमूद करण्यात आलंय.

Sonali Deshpande | Updated On: Jul 4, 2018 12:01 PM IST

तुघलकी निर्णय, विद्यार्थिनींनी कोणत्या रंगाची अंतर्वस्त्रे घालावीत हेही ठरवणार शाळा

पुणे, 04 जुलै : पुण्यातील MIT विश्वशांती गुरुकुल शाळा वादात सापडली आहे. विद्यार्थिनींनी कोणत्या रंगांची अंतर्वस्त्रे घालावीत या अजब अटीसह कोणत्या वेळी पाणी प्यावं, कोणत्या वेळी लघवीला जावं, हेही शाळेच्या रजिस्टरमध्ये नमूद करण्यात आलंय.जर नियम मोडून पाणी पिताना ,खाताना विद्यार्थी दिसला तर दंडाची तरतूद करण्यात आलीय. विशेष म्हणजे हे सगळे नियम,अटी मान्य आहेत असं प्रतिज्ञापत्र लिहून द्यायची सक्ती करण्यात आली आहे. याशिवाय जादा चार्जेस अर्थात अतिरिक्त शुल्काचा तगादा आहेच.

हेही वाचा

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर!,बालसंगोपनासाठी मिळणार सहा महिन्यांची पगारी रजा

पुण्यात हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट, अग्निशमन जवानासह चार जण जखमी

47 वर्षांनंतर नागपुरात पहिल्यांदाच पावसाळी अधिवेशन !

ग्रंथालयातून नेलेली जुनी पुस्तके परत न देणाऱ्यांसाठी अतिरिक शुल्क, सायकल पार्किंग करता वर्षाला 1500 रुपये अशी शुल्क रचना आहे. पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार दिलीय.  ही शाळा पुणे महापालिकेच्या अखत्यारीत येत असल्याने पालिकेचे अधिकारी चौकशी करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 4, 2018 09:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close