S M L

पुण्याच्या पाचही मानाच्या गणपतींचं विसर्जन

पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यात मोठ्या भक्तीमय वातावरणात जड:अंतकरणाने मानाच्या गणपतींना निरोप देण्यात आला.

Sachin Salve | Updated On: Sep 5, 2017 08:53 PM IST

पुण्याच्या पाचही मानाच्या गणपतींचं विसर्जन

05 सप्टेंबर : पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यात मोठ्या भक्तीमय वातावरणात जड:अंतकरणाने मानाच्या गणपतींना निरोप देण्यात आला. पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचं विसर्जन झालंय. कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा गणपतीनी पुणेकरांचा निरोप घेतलाय. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सर्व मानाच्या पाचही गणपतींचं विसर्जन झालंय.

पुणेरी ढोल...लेझीम पथक..सळसळत्या तरुणाईचा उत्साह...आणि अखंड पुणेकरांची श्रद्धा....अशा भक्तीमय वातावरणात पुणेरी मानाचे गणपती. देखण्या पारंपरिक आणि शिस्तबद्ध मिरवणुका हे पुण्याच्या मिरवणुकांचं खास वैशिष्ट्य. सकाळी मानाच्या गणपतींच्या मिरवणुकांना टिळक पुतळ्यापासून सुरूवात झाली.

खास पुणे ढोल ताशाच्या गजरात मानाचे गणपती निघाले. पुण्यातला मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीची पालखीतून मिरवणूक निघाली. गणेशोत्सव सुरू झाल्यापासून पुण्याचं ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीला मिरवणुकीत टिळकांनी अग्रस्थान दिलं. तर मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरीची पालखीतून मिरवणूक काढली गेली. मानाचा तिसरा गणपती- गुरुजी तालीम. हे मंडळ पुण्यातलं सगळ्यात जुनं मंडळ समजलं जातं. अतिशय देखण्या अशा या मूर्तीची फुलांच्या रथांतून मिरवणूक काढण्यात आली.

तर मानाचा चौथा गणपती म्हणजे तुळशीबाग गणपती. विविध फुलांनी सजविलेल्या मयूर रथात हा गणपती विराजमान झाला होता. आणि शेवटचा मानाचा पाचवा केसरीवाड्याच्या गणपती. मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचं विसर्जन दुपारी 4 वाजून 1 मिनिटांच्या सुमाराला झालं, त्यानंतर तांबडी जोगेश्वरीच्या गणपतीचं आणि गुरुजी तालीम गणपतीचं विसर्जन झालं. मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीचंही विसर्जन झालं. आणि सर्वात शेवटी दगडूशेठ गणपतीची मिरवणूक मात्र रात्री उशीरा सुरू राहणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 5, 2017 08:53 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close