S M L

पुण्याच्या ड्रग्जच्या धंद्यातली 'लेडी डॉन' आरती मिसाळ अखेर जेरबंद !

पुणे आणि परिसरात ड्रग्जच्या धंद्यात जम बसवलेल्या लेडी डॉन आरती मिसाळला जेरबंद करण्यात अखेर पुणे पोलिसांना अखेर यश आलंय. खडक पोलिसांनी लेडी डॉन टोळीकडून ६ लाख रुपयांचे हेरॉईन व चरस जप्त केले होते. तिच्याविरोधात पिंपरी आणि खडक पोलीस ठाण्यात एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करून तिला अटकही करण्यात आलीय.

Chandrakant Funde | Updated On: Feb 3, 2018 10:34 AM IST

पुण्याच्या ड्रग्जच्या धंद्यातली 'लेडी डॉन' आरती मिसाळ अखेर जेरबंद !

6 फेब्रुवारी, पुणे : पुणे आणि परिसरात ड्रग्जच्या धंद्यात जम बसवलेल्या लेडी डॉन आरती मिसाळला जेरबंद करण्यात अखेर पुणे पोलिसांना अखेर यश आलंय. खडक पोलिसांनी लेडी डॉन टोळीकडून ६ लाख रुपयांचे हेरॉईन व चरस जप्त केले होते. तिच्याविरोधात पिंपरी आणि खडक पोलीस ठाण्यात एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करून तिला अटकही करण्यात आलीय. गेली 6 वर्षे ती पुणे पोलिसांना चकवा देत होती. तिने गेल्या सहा वर्षात फारुख काश्मिरी, विशाल उर्फ जंगल्या सातपुते, मुकेश चव्हाण आणि रॉकी सिंग या गुंडांच्या मदतीने पुण्यात अंमली पदार्थांच्या व्यवसायात चांगलाच जम बसवून करोडोंची माया कमावलीय. या चार गुंडांपासून सहा वर्षात आरती मिसाळ हिला चार मुले देखील झालीत. गरोदर राहण्याच्या आणि प्रसूतीच्या नंतरच्या काळात मातृत्वाचा आधार घेत ही लेडी डॉन पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी होत होती. आपली बहीण पूजा मिसाळ, भाऊ गोट्या मिसाळ आणि आणखी चार साथीदारांच्या मदतीने पुण्यात अमली पदार्थांच्या व्यवसायाची पाळंमुळं पसरवली होती. गुंडांच्या दहशतीचा आधार घेऊन ती पुणे परिसरात ब्राऊन शुगर आणि चरसची विक्री करत होती. मुंबईहून ब्राऊन शुगर आणि चरसचा माल आणून त्याची पुणे परिसरात विक्री करून या लेडी डॉन आरती मिसाळने तीन फ्लॅट आणि चारचाकी गाड्या अशी बक्कळ माया कमावलीय.

पुण्यातली लेडी डॉन

नाव- आरती महादेव मिसाळ, वय 28 वर्षे

8 वर्षांपासून अंमली पदार्थाच्या तस्करीत सक्रीय

अंमली पदार्थाच्या तस्करांशी अनैतिक संबंध

Loading...

4 गुंडांशी असलेल्या संबंधांतून 4 मुलांना जन्म

लहान मुलांना पुढे करून अंमली पदार्थाची तस्करी करण्यात माहीर

मुंबई ते पुण्यादरम्यान अंमली पदार्थाची तस्करी

अंमली पदार्थाच्या तस्करीतून 3 फ्लॅट्स आणि 4 अलिशान वाहनांची मालकीण

अखेर पुण्यातल्या या लेडी डॉनला पोलिसांनी अटक केली असून तिच्याविरोधात मोक्का 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 3, 2018 10:32 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close