कृषि सेवकपदाच्या परीक्षेत आर्थिक घोटाळा ?

राज्यात कृषी सेवकपदासाठी झालेल्या परीक्षेत मोठा आर्थिक घोटाळा झाल्याची शक्यता आहे. या प्रकरणी गजानन एंटरप्रायजेस आणि परीक्षा परिषदेवर गुन्हाही दाखल करण्यात आलाय.

Sachin Salve | Updated On: May 4, 2017 10:22 PM IST

कृषि सेवकपदाच्या परीक्षेत आर्थिक घोटाळा ?

अद्वैत मेहता,पुणे                        

04 मे : राज्यात कृषि सेवकपदासाठी झालेल्या परीक्षेत मोठा आर्थिक घोटाळा झाल्याची शक्यता आहे. या प्रकरणी गजानन एंटरप्रायजेस आणि परीक्षा परिषदेवर गुन्हाही दाखल करण्यात आलाय.असं असलं तरी उमेदवार भर्ती करताना सरकार फेरपरीक्षा न घेता भारांकन पद्धतीवर विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप आहे.

कृषि आयुक्तालयाने राज्यात 730 कृषी सेवकपदे भरण्यासाठी 15 डिसेंबर 2015 ला जाहिरात दिली. आयुक्तालयाणे परीक्षेची जबाबदारी महाराष्ट्र राज्य परिषदेवर दिली. परिषदेने गजानन एंटरप्रायजेस या खाजगी कंपनीवर जबाबदारी टाकली. 6 ऑगस्ट ला 65 हजार 462 उमेदवारांनी नोंदणी केली. 41 हजार 357 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 6 सप्टेंबरला परीक्षेचा निकाल लागला आणि गैरप्रकार विद्यार्थ्यांनीच शोधून काढला. मोजक्या विद्यार्थ्यांना 200पैकी 180 गुण मिळणं, इतर सर्व विद्यार्थ्यांना 150 पेक्षा कमी गूण मिळणं, एका विद्यार्थ्याने तर ठाणे आणि औरंगाबाद अशा 2 केंद्रावरून परीक्षा दिली. आता सरकार फेरपरिक्षा घ्यायला टाळाटाळ करतंय.

विद्यार्थ्यांनीच परिक्षेतला हा गैरप्रकार बाहेर काढला आणि जाग आलेल्या कृषी विभागाने तब्बल 9 महिन्यानंतर पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.पण अजून कुणावरही कारवाई झाली नाहीय.

फेरपरीक्षा न घेता भारांकन पद्धतीने म्हणजे 10 वीचे आणि पदवीच्या गुणांवर आधारित पद्धतीने प्रवेश देणं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग आहे असा दावा करत पारदर्शी कारभाराचा आग्रह धरणाऱ्या फडणवीस सरकारने परीक्षा घोटाळ्यातील गुन्हेगारांना गजाआड करावं आणि फेरपरीक्षा घेऊन मेहनती, लायक विद्यार्थ्यांना कृषिसेवक म्हणून काम करायची संधी द्यावी अशी रास्त मागणी या विद्यार्थ्यांची आहे.कृषिमंत्री, मुख्यमंत्री या मागणीला प्रतिसाद देणार का हा खरा सवाल आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 4, 2017 10:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close