पुण्यात मृत्यूतांडव, मुख्यमंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश

पुण्यात मृत्यूतांडव, मुख्यमंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश

कोंढव्यातील दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

  • Share this:

पुणे, 29 जून : पुण्यातील (Pune) कोंढवा इथं बडा तलाव मस्जिद परिसरातील आल्कन स्टायलस सोसायटीची संरक्षक भिंत (compound wall collapse) कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी अग्निशमन दल आणि एनडीआरएफ (NDRF)कडून मदत व बचाव कार्य सुरू आहे. या दुर्घटनेबद्दल आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

'कोंढव्यात घडलेली घटना दु:ख देणारी आहे. या घटनेत ज्या कुटुंबातील लोकांचा मृत्यू झाला, त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. जखमी झालेल्या व्यक्तींची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी, यासाठी मी प्रार्थना करत आहे. या घटनेची सखोल चौकशी करावी, अशा सूचना पुणे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत,' अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

पुण्यात मृत्यूचं तांडव

संरक्षक भिंत कोसळून घडलेल्या या दुर्घटनेत मृत झालेले सर्व जण मजूर आहेत. मध्यरात्री दोन ते अडीचच्या सुमारास ही घटना घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेत 2 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथे 17 जण राहत होते. त्यापैकी 15 जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आणखी 2 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जखमीपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. या दुर्घटनेत एक व्यक्ती बचावला आहे. हे सर्व मजूर बिहारमधील असल्याची माहिती आहे.

पुण्यात कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे ही भिंत कोसळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एका इमारतीचे काम सुरु होते आणि तेथे काम करणाऱ्या मजुरांसाठीच ही कच्ची घरे बांधण्यात आली होती. त्यावरच ही भिंत कोसळून 15 मजुरांचा मृत्यू झाला.

Loading...

मृतांची नावे-

1)आलोक शर्मा -28 वर्षे

2)मोहन शर्मा -20 वर्षे

3)अजय शर्मा -19

4)अभंग शर्मा -19

5)रवि शर्मा -19

6)लक्ष्मीकांत सहानी -33

7)अवधेत सिंह -32

8) सुनील सींग -35

9) ओवी दास -6 वर्षे (लहान मुलगा )

10)सोनाली दास -2 वर्षे (लहान मुलगी )

11) विमा दास -28

12) संगीता देवी -26

जखमी :-

1) पूजा देवी -28 वर्षे

VIDEO: सुप्रिया सुळे वारीत सहभागी, हाती वीणा आणि मुखी ज्ञानबा तुकारामचा नारा...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 29, 2019 10:11 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...