2 वर्षांच्या चिमुकल्याचं अपहरण, पोलिसांनी शक्कल लढवून केली सुखरूप सुटका

अपहरणकर्त्यांनी पुष्कराजला सोडून परिसरातून फळ काढला असला तरी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Mar 24, 2019 11:36 AM IST

2 वर्षांच्या चिमुकल्याचं अपहरण, पोलिसांनी शक्कल लढवून केली सुखरूप सुटका

वैभव सोनवणे, पुणे, 24 मार्च : वडाची वाडी येथून अपहरण झालेल्या पुष्कराज धनवडे या चिमुरड्याची सुखरूप सुटका करण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी शक्कल लढवून अपहरणकर्त्यांवर दबाव आणला. यानंतर अपहरणकर्त्यांनी पुष्कराजला त्याच्या घराच्या परिसरात सोडून परिसरातून पळ काढला. दरम्यान, अपहरकर्त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. पुष्कराज सोमनाथ धनवडे (वय 2 वर्षे) याचे शनिवारी (23 मार्च) रात्री वडाची वाडी परिसरातून अपहरण करण्यात आलं होतं. याबाबत त्याचे वडील सोमनाथ तानाजी धनवडे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. रात्रीपासून पुणे पोलिसांची विविध पथक आणि पुष्कराजचे नातेवाईक त्याचा शोध घेत होते.

पोलिसांच्या प्रयत्नांमुळे रविवारी(24 मार्च) सकाळी 7 वाजता अपहरण करणाऱ्याने पुष्कराजला वडाच्या वाडी परिसरात सोडून पळ काढला. पोलीस अपहरणकर्त्यांचा शोध घेत आहेत. पुष्कराजच्या पालकांनी पोलिसांचे आभार मानत सुटकेचा निश्वास सोडला.

VIDEO: बारामतीतून उमेदवारी मिळाल्यानंतर कांचन कुल यांची पहिली प्रतिक्रियाबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 24, 2019 10:51 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...