आयटी हब ही पुण्याची ओळख पुसली जाणार?

स्टार्ट अप इंडियाची पोलखोल झाली असेच म्हणावे लागेल

News18 Lokmat | Updated On: Sep 2, 2018 10:05 AM IST

आयटी हब ही पुण्याची ओळख पुसली जाणार?

गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड, ०२ सप्टेंबर-  आयटी हब ही पुण्याची ओळख पुसली जाण्याच्या मार्गावर आहे. दररोजच्या जीवघेण्या आणि श्वास कोंडणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे शेकडो आयआयटीएन्स त्रस्त झाले आहेत. त्यामुळेच आयटी हबमधल्या तब्बल ५६ कंपन्या स्थलांतरित होण्याच्या मार्गावर आहेत. ३ लाख आयटी अभियंते आणि १५० हून अधिक लहान- मोठ्या आयटी कंपन्यांमुळे देशातील सर्वात वेगवान आयटी हब अशी पुण्याची ओळख आहे. मात्र शेकडो कोटींचा महसूल देऊनही आयटी पार्कचे रस्ते खड्ड्यातच आहेत. त्यामुळे संतापलेल्या आयआयटीयन्सनी ऑनलाइन याचिका दाखल केली आहे. त्यामुळे स्टार्ट अप इंडियाची पोलखोल झाली असेच म्हणावे लागेल.

पुण्याजवळील हिंजवडी परिसरात असलेल्या राजीव गांधी इंफोटेक पार्कमध्ये दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे एकीकडे शेकडो आयटी अभियंते त्रस्त झाले आहेत. तर अनेक कंपन्या स्थलांतरित होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती समोर आली आहे .हा सगळा प्रकार डिजिटल इंडिया संकल्पने बरोबरच स्मार्ट  सिटीच पितळ उघड पडणारा आहे.

राजीव गांधी इंफिटेक् पार्क, सुमारे 3 लाख आयटी अभियंते आणि १०० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय आयटी कंपन्यामुळे, देशातील सर्वात वेगवान आयटी हब अशी या पार्कची झालेली ओळख, आता पुसली जाऊन हे आयटी पार्क आता ट्रॅफिक पार्क म्हणून ओळखल जाऊ लागलंय. शेकडो कोटींचा महसुल देणाऱ्या या आयटी पार्कमधील रस्ते तर खड्यातच आहेत आणी या रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी इथल्या तरुणांचं भविष्यही खड्यात घालतेय.

दररोज होणारी वाहुतक कोंडी सोडविण्यासाठी अनेक पर्याय आहेत मात्र, केवळ राजकीय इच्छाशक्तिचा अभाव असल्याने हिंजवडीच्या ट्रॅफिकचा प्रश्न मागील चार वर्षांपासून जाम झालाय. अनेक वेळा तक्रार करूनही  त्याकडे कुणी लक्ष देत नसल्याने आता हिंजवडीतील या आयटी अभियंत्यांनी, थेट ऑनलाइन याचिका दाखल करून सरकारविरुद्ध बंड पुकारलाय.

एकंदरीत काय तर, एकीकडे राज्यातील शेतकरी सरकारी धोरणामुळे आधीच मेटाकुटिला आलाय तर, दुसरीकडे सरकारी अनास्थेमुळे उच्च शिक्षितांचेही असे हाल होतायत, त्यामुळे सरकार नेमकं काम तरी कुणासाठी करतंय हा खरा प्रश्न आहे.

Loading...

VIDEO : धावत्या लोकलच्या दारात तरुणीची स्टंटबाजी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2018 10:05 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...