S M L

महाबळेश्वरहून जास्त थंड झालं पुणे; राज्यात थंडीचा कडाका

पुणे आणि परिसरातही थंडीचा चांगलाच कडाका जाणवत आहे. पुणे आणि पाषाण परिसरात 8.7 अंश सेल्सिअस तापमान, तर लोहगावमध्ये 10.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. कडाक्‍याच्या थंडीमुळे रात्रीच्या वेळी नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत

Chittatosh Khandekar | Updated On: Dec 30, 2017 12:52 PM IST

महाबळेश्वरहून जास्त थंड  झालं पुणे; राज्यात थंडीचा कडाका

 30 डिसेंबर:   सध्या पुण्यामध्ये  थंड हवेेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरहूनही जास्त थंडी पडली आहे.   उत्तरेकडून येणाऱ्या थंडीच्या लाटेमुळे संपूर्ण महाराष्ट्र गारठला आहे.

पुणे आणि परिसरातही थंडीचा चांगलाच कडाका जाणवत आहे. पुणे आणि पाषाण परिसरात 8.7 अंश सेल्सिअस तापमान, तर लोहगावमध्ये 10.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. कडाक्‍याच्या थंडीमुळे रात्रीच्या वेळी नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत.हे महाबळेश्‍वरमध्ये सध्या 13.4 अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदविलं गेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून महाबळेश्‍वरपेक्षा पुण्यातील किमान तापमान तीन ते पाच अंश सेल्सिअसने कमी आहे.

तर दुसरीकडे  विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे.  तर कोकण-गोवा, मध्य-महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. विदर्भात थंडीच्या लाटेची शक्‍यता राज्यात थंडीचा कडाका आणखी दोन-तीन दिवस कायम राहणार आहे.मंगळवारपर्यंत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी शनिवारी थंडीचा लाट येण्याची शक्‍यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 30, 2017 12:52 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close