S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस; ढगाळ वातावरणामुळे थंडी पळाली

भागात सुमारे तासभर झालेल्या या पावसामुळे आठवडी बाजारात शिरलंय. तर ढगाळ वातावरणामुळे राज्याच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली असल्यामुळे थंडीचा जोर कमी झाला आहे.

Updated On: Dec 6, 2018 05:35 PM IST

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस; ढगाळ वातावरणामुळे थंडी पळाली

कोल्हापूर, 6 डिसेंबर : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात गुरुवारी दुपारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. पारगड भागात सुमारे तासभर झालेल्या या पावसामुळे आठवडी बाजारात पाणी शिरलं होतं. तर एन हिवाळ्यात डिसेंबरमध्ये झालेल्या या पावसामुळे शेतकरी अवाक झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे राज्याच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली असल्यामुळे थंडीचा जोर कमी झाला आहे. तर येत्या 24 तासात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे.

राज्यातील बहुतांश ठिकाणी गेल्या पाच-सहा दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे हे ढग जमा झाले आहेत. दक्षिण कर्नाटक आणि परिसरावर असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती, आणि पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात हलके ढग स्थिरावले आहेत. यामुळे राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे.

विषुववृत्ताजवळील हिंदी महासागर आणि दक्षिण बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं आहे. त्यातच पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचे प्रवाहदेखील सक्रिय असल्याने पुणे वेधशाळेनं कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता २४ तासांपूर्वी वर्तवली होती. गेल्या मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस झाल्याचीही माहिती आहे.


24 तासात गोव्यासह उर्वरित राज्यात हवामान कोरडं होतं. ढगाळ वातावरणामुळे मध्य महाराष्ट्राच्या काही भागातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे, तर कोकण, गोवा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनते किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागातलं किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं.

गुरुवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे 12.6 अंश सेल्सियस नोंदविल्या गेलं. तर सर्वाधिक किमान तापमानाची नोंद मुंबईच्या कुलाबा येथे 23.5 अशी करण्यात आली. गोव्यातल्या पणजीतसुद्धा 23.5 अंश सेल्सियस किमान तापमान नोंदविल्या गेलं. कोल्हापूरचं किमान तापमान 20.3 होतं. पुण्याचं किमान तापमान 15.1 अंश सेल्सियस होतं. औरंगाबाद येथे 13.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर गेल्या आठवड्यात वाढत्या थंडीमुळे चर्चेत राहिलेल्या अहमदनगरमध्ये 13.6 किमान तापमान नोंदविल्या गेलं.

येत्या 24 तासात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील असं पुणे वेधशाळेनं म्हटलंय.


गुरुवारी राज्यातील विविध ठिकाणचं किमान तापमान असं होतं..

मुंबई (कुलाबा) 23.5

मुंबई (सांताक्रूज) 19.8

पुणे 15.1

औरंगाबाद 13.4

उस्मानाबाद 17.2

नागपूर 13.1

अकोला 16.6

बुलडाणा 17.2

चंद्रपूर 18.4

गोंदिया 14.0

वर्धा 16.1

यवतमाळ 17.4

ब्रम्हपुरी 14.0

कोल्हापूर 20.3

मालेगाव 15.6

नाशिक 12.6

सांगली 17.9

सातारा 16.8

सोलापूर 19.3

रत्नागिरी 21.8

पणजी (गोवा) 23.5

डहाणू 19.4


 VIDEO: 'साताऱ्यात फक्त मीच चालतो'च्या डायलॉगवर उदयनराजेंचे कार्यकर्ते भडकले, निर्मात्याची गाडी फोडली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 6, 2018 05:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close