EXCLUSIVE VIDEO : अनधिकृत होर्डिंग कोसळून पुण्यात 4 बळी; पाहा थरारक व्हिडिओ

EXCLUSIVE VIDEO : अनधिकृत होर्डिंग कोसळून पुण्यात 4 बळी; पाहा थरारक व्हिडिओ

  • Share this:

 

पुणे, 05 आॅक्टोबर : पुण्यातील मंगळवार पेठेतील जुन्या बाजार चौकात सिग्नलवर होर्डिंग कोसळल्याची घटना घडली. या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आलाय. अवघ्य काही सेकंदात होत्याचं नव्हतं झालं. या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झालाय तर 10 जण जखमी झाले आहे.

मंगळवार पेठेतील जुन्या बाजारात रेल्वेच्या जागेमध्ये अनधिकृत होर्डिंग उभारण्यात आले होते. हे होर्डिंग हटवण्याचे काम सुरू होते त्यावेळी ही दुर्घटना घडली. होर्डिंगचे अँगल खालून कापण्यात आल्यामुळे होर्डिंग मधोमध कोसळला. जवळच असलेल्या सिग्नलवर उभ्या असलेल्या वाहनांवर लोखंडी होर्डिंग कोसळला.

तिथे उभ्या असलेल्या 3 रिक्षा आणि 2 दुचाकी आणि एका कारवर होर्डिंग कोसळले. होर्डिंग कोसळल्यानंतर एकच धावपळ उडाली. होर्डिंगखाली वाहनं अडकल्यामुळे या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झालाय. तर 6 जण जखमी झाले. त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 10 जखमींपैकी 4 जणांची प्रकृती चिंताजनक आहे

काय घडलं नेमकं ?

प्रादेशिक परिवहनकडून जुन्या बाजाराकडे येणाऱ्या रस्त्यावरील चौकात ही दुर्घटना घडली. एका खासगी कंपनीचे हे होर्डिंग होते. अनधिकृतपणे हे रेल्वेच्या जागेत उभारण्यात आले होते.होर्डिंग काढण्याचे काम सुरू असताना अचानक ते कोसळले.होर्डिंग कोसळल्यानंतर ते शेजारीच असलेल्या सिंग्नलवर उभ्या असलेल्या वाहनांवर कोसळले. होर्डिंग खाली तीन रिक्षा, दोन दुचाकी, एक कार अडकली. या वाहनांमध्ये असलेले नागरिक गंभीर जखमी झाले होते. या दुर्घटनेत एकूण 10 जण जखमी झाले जखमींना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 10 पैकी चौघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जातंय.

या दुर्घटनेत एक मुलीचा पाय तुटलाय. दुर्घटना घडल्यानंतर स्थानिकांनी धाव घेऊन जखमींना बाहेर काढलं आणि उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या आणि पोलीस दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू आहे.

=============================================

पुण्यातील होर्डिंग दुर्घटनेचे भीषण PHOTOS

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 5, 2018 06:40 PM IST

ताज्या बातम्या