S M L

दहावीच्या निकालात सर्वच विषयांत 35 गुण !

पण, सगळ्याच विषयात 35 गुण मिळवत 35 टक्क्यांवर पास होण्याची किमया पुण्यातील दिव्या मारूती शिंदे या विद्यार्थीने करून दाखवलीये.

Sachin Salve | Updated On: Jun 13, 2017 11:41 PM IST

दहावीच्या निकालात सर्वच विषयांत 35 गुण !

13 जून : काठावर पास होणे काय असते ते फक्त एखाद्या ढ विद्यार्थ्यालाच माहीत असते. पण, सगळ्याच विषयात 35 गुण मिळवत 35 टक्क्यांवर पास होण्याची किमया पुण्यातील दिव्या मारूती शिंदे या विद्यार्थीने करून दाखवलीये.

कोणत्याही परीक्षेत जास्तीत जास्त टक्के मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये धडपड सुरू असते. आज दहावीचा निकाल जाहीर झाला. कुणाला 100 पैकी 100 मार्क मिळाले तर कुणाला त्यापेक्षा कमी. पण पुणे विभागातील दिव्या शिंदे या विद्यार्थीने सर्वच विषयात 35 मार्क मिळवले आहे.

मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्र अशा सर्वच विषयात प्रत्येकी 35 गूण मिळाले आहेत. बेस्ट ऑफ 5 नुसार तीचे एकूण गूण 175 एवढे झाले असून,  टक्केवारीही बरोबर 35 टक्के एवढीच आहे.

असाच पराक्रम लातूर विभागातील परंडा येथील जिल्हा परिषद प्रशाळेत शिकणाऱ्या नाहेद अहमद कुरेशीने ही केलाय. या पठ्ठ्यालाही 35 टक्के मार्क मिळाले आहे. एककीकडे यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक होतं आणि दुसरीकडे 35 टक्के मिळवणाऱ्या या पराक्रमविरांनी लक्ष वेधून घेतलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 13, 2017 10:24 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close