S M L

भाजपमध्ये नोकरी देतो, पण लग्न एकच कर ; गिरीश बापटांचा कार्यकर्त्याला अजब सल्ला

पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात

Sachin Salve | Updated On: Mar 31, 2018 07:19 PM IST

भाजपमध्ये नोकरी देतो, पण लग्न एकच कर ; गिरीश बापटांचा कार्यकर्त्याला अजब सल्ला

पुणे, 31 मार्च : भाजपमध्ये ये नोकरी देतो,लग्न कर पण एकदाच कर असा अजब सल्ला पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आपल्या कार्यकर्त्याला दिलाय.

पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात.  नुकताच पुण्यात एका उड्डाणपुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमात एक कार्यकर्ता फोनवर बोलत होता, त्याला बापट यांनी घे बायकोशी बोलून असा सल्लाच दिला. तेव्हा तो अविवाहित आहे हे उपस्थितांनी सांगितलं तेव्हा बापट यांची जीभ घसरली.

गिरीश बापट म्हणाले की, बेरोजगार आहे तर भाजपमध्ये ये रोजगार देतो, नोकरी देतो पण लग्न मात्र एकच करं असा  सल्लाच त्यांनी दिला.

या आधीही बापट यांनी जाहीर कार्यक्रमात मुक्ताफळं उधळली आहेत. आता आपलं सरकार आहे पुढचं सरकार आपलं येईल की नाही सांगता येत नाही असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 31, 2018 06:54 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close