S M L

पुण्यात 8 दिवसांमध्ये 150 आगीच्या घटना

गेल्या ८ दिवसांमध्ये तब्बल १५० आग लागल्याच्या घटनांची अग्निशमन विभागाकडे नोंद झालीये.

Sachin Salve | Updated On: Apr 21, 2017 09:26 PM IST

पुण्यात 8 दिवसांमध्ये 150 आगीच्या घटना

वैभव सोनवणे,पुणे

21 एप्रिल : पुणे अग्निशमन दलाला गेल्या १५ दिवसात तब्बल तिपटीने काम वाढलंय. दिवसभरात एखाद दोन असणाऱ्या आगीच्या घटना गेल्या काही दिवसांपासून वाढल्यात. गेल्या ८ दिवसांमध्ये तब्बल १५० आग लागल्याच्या घटनांची अग्निशमन विभागाकडे नोंद झालीये.

पुण्यामध्ये गेल्या ८ दिवसांमध्ये तब्बल १५० आग लागल्याच्या घटनांची अग्निशमन विभागाकडे नोंद झालीये. मार्च महिन्यापासून सरासरी रोज २० फोन हे आग लागल्याचे अग्निशमन दलाकडे येताहेत.तापमानामध्ये झालेली प्रचंड वाढ याचं प्रमुख कारण आहे. घरातील एलपीजी सिलिंडरमधून गॅस लिकेज किंवा शॉर्ट सर्किटच्या घटना यामध्ये प्रामुख्याने आहेत. त्यामुळे एकाच ठिकाणी  क्षमतेपेक्षा जास्त वापर झाल्यास शॉर्टसर्किटची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढतेय.

तर एलपीजी सिलिंडर वाढत्या तापमानामुळे  लीकेजच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडतात. त्यामुळे नागरिकांनी छोट्या छोट्या गोष्टींची काजळी घेतली तरी या गोष्टी टाळता येऊ शकतात.

नेमक्या काय अडचणी आहेत ?

Loading...
Loading...

लोकसंख्येच्या प्रमाणात सध्या 30 अग्निशमन केंद्राची गरज

प्रत्यक्षात मात्र केवळ 13 अग्निशमन केंद्र कार्यरत

1 हजार कर्मचाऱ्यांची गरज,केवळ 500 कर्मचारी कार्यरत

डिजिटल युगात लेखी नोंदींवरच चालतोय कंट्रोल रूम

कंट्रोल रूममध्ये एकही कॉम्प्युटर नाही

अशा स्थितीत रोज २० आगीच्या घटनांचा सामना करताना अग्निशमन दलाची पुरती दमछाक होतेय. त्यामुळे एकीकडे महापालिका प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा करत असतानाच नागरिकांनीही आग लागणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 21, 2017 09:26 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close