मित्राने भेटण्यास नकार दिला म्हणून इंजिनिअर तरुणीची आत्महत्या

मित्राने भेटण्यास नकार दिला म्हणून इंजिनिअर तरुणीची आत्महत्या

कोंढव्यातील सिल्व्हरलाईन सोसायटीत ही दुर्देवी घटना घडली आहे. जुही गांधी असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे.

  • Share this:

17 मे : मित्राने भेटण्यासाठी वेळ दिला नाही म्हणून कोंढव्यात एका आयटी इंजिनिअर तरूणीने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे.

कोंढव्यातील सिल्व्हरलाईन सोसायटीत ही दुर्देवी घटना घडली आहे. जुही गांधी असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुही बंगळुरु येथील एका आयटी कंपनीत कामाला आहे. ती मित्राला भेटण्यासाठी पुण्यामध्ये आली होती. मंगळवारी ती मित्राच्या सिल्व्हर लाईन सोसायटीमध्ये त्याला भेटण्याकरीता गेली.

मात्र, मित्राने आपला उद्या पेपर आहे. मी तुला नंतर भेटतो असं सांगितलं म्हणून रागाच्या भरात जुहीने तिच्या मित्राच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून तिने आपली जीवनयात्रा संपवली. जुहीच्या आकस्मिक मृत्यूचा गुन्हा कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे. जुहीने इतकं टोकाच पाऊल का उचललं याचा कोंढवा पोलीस पुढील तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 17, 2017 06:28 PM IST

ताज्या बातम्या