S M L

डीएसके प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्राचे 5 अधिकारी अाणि डीएसकेंचा 1 अभियंता यांना अटक

एकूण 6 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं आणि आता त्यांना अटक झालीय.

Sonali Deshpande | Updated On: Jun 20, 2018 03:06 PM IST

डीएसके प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्राचे  5 अधिकारी अाणि डीएसकेंचा 1 अभियंता यांना अटक

पुणे, 20 जून : डीएसके गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणात आज बँक ऑफ महाराष्ट्राचे 3 अधिकारी आणि डीएसकेंच्या एका अभियंत्याची चौकशी सुरू होती. एकूण 6 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं आणि आता त्यांना अटक झालीय.

डीएसकेंच्या कागदपत्रांमध्ये अनेक अनियमितता असल्याचं माहीत असूनही त्यांना बेकायदेशीररित्या कर्ज देण्याचा ठपका या अधिकाऱ्यांवर आहे. बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ आर. पी. मराठे, तत्कालीन क्षेत्रीय व्यवस्थापक एन. एस. देशपांडे, माजी एमडी सुशील महुनोत आणि डीसके डेव्हलपर्सचे मुख्य अभियंते राजीव नेवासकर यांची चौकशी सध्या सुरू होती.

प्रकल्पाला ज्या कारणासाठी कर्ज देण्यात आले त्या पैशाचा  बँक अधिकाऱ्यांशी संगनमताने अपहार करण्यात आला. बँकेचा पैसा शेवटी सार्वजनिक पैसा आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वे सर्व बँकांना लागू आहेत. सार्वजनिक संस्थांच्या  पैशांचा  उपयोग खाजगी पैसा असल्यासारखा करण्यात आला. या व्यवहारांमध्ये कोणताही कायदेशीरपणा नाही.

हेही वाचा

अमरावतीच्या मनीषा खत्रींना अंबर दिव्याचा मोह आवरेना !

Loading...

आज जागतिक निर्वासित दिन, प्रश्न अजूनही कायम

कठड्याबाहेर उभं राहून सेल्फी काढण्याच्या नादात महिलेचा 600 फूट दरीत कोसळून मृत्यू !

असा आरोप आहे की बँकेने अनेक अनियमितता माहीत असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून बेकायदेशीरपणे कर्जे  मंजूर केली. कर्जे मंजूर करण्यापूर्वी कोणतीही काळजी घेतली नाही. कर्ज मंजूर करताना भारतीय रिझर्व्ह बँकेचे नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन झाले नाही. कर्जाचा वापर ज्या कारणासाठी  ते दिले होते त्याच कारणासाठी ते वापरले जात आहे की नाही हे तपासले नाही. एक कर्ज तर "कॅश फ्लोचा तात्पुरता मेळ घालण्यासाठी " या कारणासाठी मंजूर करण्यात आले

कोणाकोणाला झाली अटक?

रविंद्र मराठे - बँक अधिकारी

सुशील मुनहोत - बँक अधिकारी

आर. के. गुप्ता - बँक अधिकारी

नित्यानंद देशपांडे - बँक अधिकारी

एम. एस. घाटपांडे ( सीए, DSK)

राजीव नेवासकर ( मुख्य अभियंता)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 20, 2018 12:31 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close