लग्न मोडल्यानं तरुणाचा माय-लेकींवर चाकूने हल्ला, तरुणीचा मृत्यू

लग्न मोडल्यामुळे शरीफ हा नाराज होता. त्या नैराश्यातूनच त्याने चाकू हल्ला केला.

News18 Lokmat | Updated On: Jul 23, 2019 07:21 PM IST

लग्न मोडल्यानं तरुणाचा माय-लेकींवर चाकूने हल्ला, तरुणीचा मृत्यू

वैभव सोनावणे,पुणे 23 जुलै : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात गुन्ह्यांच्या संख्येत वाढ होतेय. आज मंगळवारी तर फरासखाना गणेश पेठेत एका लग्न मोडल्याच्या रागात एका तरुणाने भरदिवसा धारधार शस्त्राने माय लेकींवर चाकूने हल्ला केला यात तरुणीचा मृत्यू झाला तर महिला गंभीर जखमी आहे. शरीफ शेख असं त्या तरुणाचं नाव आहे. शरीफने चाकूने सपासप वार केले पळून जाण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांनी शरीफला ताब्यात घेतलंय. शरीफचं नाजमी शेख या मुलीशी लग्न जमलं होतं. मात्र काही कारणांमुळे ते मोडलं, त्यामुळे भडकलेल्या शरीफने हा हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

पुणे पोलिसांची दरवाजा तोडून घरात एंट्री,फासावर लटकणाऱ्या तरुणाला थोडक्यात वाचवलं

नाजमी शेख (18) असं या हल्यात जखमी मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे. याप्रकरणी शरीफ शेख (22) याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी शरीफ व नाजमी यांचे काही माहिन्यापुर्वी लग्न ठरले होते. मात्र, काही कारणावरुन हे लग्न मोडले. याचा राग मनात धरून शरीफ हा नाजमीच्या घरी आला. त्यावेळी तीची आई फैमिदा सादिक शेख (45) याही तिथे होत्या. त्याने वाद घालायला सुरुवात केली आणि अचानक दोघींवर हल्ला केला. आरोपीने चाकूने वार केल्याचं पोलीसांनी सांगितलं. लग्न मोडल्यामुळे शरीफ  हा नाराज होता. त्या नैराश्यातूनच त्याने हे कृत्यू केलं असण्याची शक्यता आहे. नेमकं काय झालं हे सुरवातीला लोकांना कळालंच नाही. लोकांनी शरीफला पकडून ठेवलं आणि पोलिसांच्या हवाली केलं. पोलीस आता अधीक तपास करत आहेत.

VIDEO: विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहारच ठरतोय जीवघेणा!

पिंपरीत अडीच वर्षांच्या मुलीचं अपहरण आणि हत्या

Loading...

पिंपरी चिंचवड- पिंपरी चिंचवडमध्ये अडीच वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी (22 जुलै) संध्याकाळी ती घरातून बेपत्ता झाली होती. यानंतर तिचा शोध असताना घरातल्यांना तिचा मृतदेहच सापडला. या घटनेमुळे तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या चिमुकलीसोबत काही गैरप्रकार झाला आहे का? याची माहिती पोस्टमार्टेम अहवालातून समोर येईल. पोलिसांनी तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

VIDEO: 5 सेकंदात पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली 5 मजली इमारत

मिळालेल्या माहिती अनुसार, पिंपरी चिंचवडच्या सांगवी भागात राहणारी अडीच वर्षीय चिमुकली सोमवार संध्याकाळी घराबाहेर गेली आणि त्यानंतर परतच आली नाही. कामगार वसाहतीमध्ये राहत्या घरातून बेपत्ता झाल्यानंतर नातेवाईकांनी जवळपासच्या सर्वत्र परिसरात तिचा शोध घेतला पण ती सापडली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: pune crime
First Published: Jul 23, 2019 07:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...