पुणे, 17 जून : झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला टोळीनं मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला. नळस्टॉप चौकाजवळ काही तरुणांनी जेवणाची ऑर्डर दिली. ऑर्डर आल्यावर मात्र कॅन्सल करण्याचा तरुणांनी तगादा लावला. मात्र ऑर्डर कॅन्सल होणार नाही असं डिलिव्हरी बॉयनं सांगताच तरुणांनी काठीने त्याला मारहाण केली. प्रवीण कदम असं मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान मारहाण करणारे तरुण फरार असून त्यांचा तपास सुरू आहे.