कारची कंटेनरला जोरदार धडक, 20 दिवसाच्या बाळासह एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

पुणे-नगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटनेरला पाठीमागून येणाऱ्या कारची जोरदार धडक बसली.

News18 Lokmat | Updated On: Apr 21, 2019 12:51 PM IST

कारची कंटेनरला जोरदार धडक, 20 दिवसाच्या बाळासह एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

पुणे, 21 एप्रिल : पुणे-नगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटनेरला पाठीमागून येणाऱ्या कारची जोरदार धडक बसली. या दुर्घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. मृतांमध्ये दोन सख्खे भाऊ, त्यांची आई आणि अवघ्या 20 दिवसांच्या बाळाचा समावेश आहे.

किशोर हाके (वय 32 वर्ष), शुभम हाके (वय 25 वर्ष)विमल माधव अशी मृतांची नावं आहेत. या अपघातात पुष्पा हाके गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. रविवारी (21 एप्रिल) पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर हाके  यांना 20 दिवसांपूर्वीच मुलगा झाला होता. पत्नी आणि मुलाला आपल्या घरी आणण्यासाठी ते औरंगाबादेत भाऊ आणि आईसह गेले होते. प्रवासादरम्यान काळानं त्यांच्यावर घाला घातला. औरंगाबादहून रात्री कारने पुन्हा वाघोलीच्या दिशेनं निघाल्यानंतर पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास त्यांची कार शिरूर बायपास पाचर्णेमळा येथील पुलाजवळ पोहोचली. यावेळेस  पुलावर रस्त्याच्या कडेला बंद असलेल्या कंटेनरला पाठीमागून येणाऱ्या त्यांच्या कारची जोरदार धडक बसली. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तसंच अपघाताचा आवाज जवळपास अर्धा किलोमीटरपर्यंत ऐकू गेला. या अपघातात कारचा पूर्णपणे चुराडा झाला आहे. दरम्यान, शिरूर पोलीस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

वाचा अन्य बातम्या

श्रीलंकेतील बॉम्बस्फोटामुळे धक्का, विराटची ट्विटरवरून शोकसंवेदना

Loading...

माढ्यात प्रतिष्ठेची लढाई, शेवटच्या दिवशी भाजपकडून 4 नेते प्रचाराच्या मैदानात

'बाबरी मस्जिद आम्ही पाडली, तिथेच मंदिर बांधणार',ECकडून साध्वी प्रज्ञांना नोटीस

VIDEO: ...मलाच माझी वाटते लाज: उदयनराजे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2019 12:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...