मोबाइल गेमचा पराभव लागला जिव्हारी, पुण्यात तरुणानं केली आत्महत्या

मोबाइल गेमचा पराभव लागला जिव्हारी, पुण्यात तरुणानं केली आत्महत्या

मोबाइल गेमच्या नादात एका महाविद्यालयीन तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • Share this:

पुणे, 19 जुलै : मोबाइल गेमच्या नादात एका महाविद्यालयीन तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील पेरणे फाटा येथील ही घटना आहे. दिवाकर ऊर्फ संतोष धनपाल माळी (वय 19)असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. गुरुवारी (18 जुलै) सकाळी ही घटना उघडकीस आली. दिवाकरला नेमक्‍या कोणत्या गेमचं व्यसन लागलं होतं? त्यानं गेममुळेच आत्महत्या केली आहे का? याबाबत पोलीस कसून चौकशी करत आहेत. या प्रकरणी लोणीकंद पोलीस तपास करत आहेत.

(पाहा :दारूची अवैध वाहतूक करणारे 7 जण ताब्यात, इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे कागल ( कोल्हापूर) येथील रहिवासी असलेले माळी कुटुंब नोकरीनिमित्त पेरणेफाटा येथे स्थायिक झाले होते. दिवाकरचे वडील खासगी कंपनीत नोकरी करत आहेत. तर आई गृहिणी आहे. अत्यंत शांत स्वभावाचा दिवाकर वाघोली येथील महाविद्यालयात कॉमर्स पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. मात्र, अलीकडे तो रात्र रात्रभर मोबाइलवर गेम खेळत असे. गेल्या दोन दिवसांपासून तो कॉलेजलाही गेलेला नव्हता.

एक वृत्तवाहिनीनं दिलेल्या माहितीनुसार, मोबाइल गेममध्ये झालेला पराभव दिवाकरच्या इतका जिव्हारी लागला की त्यानं थेट आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं.

(पाहा :VIDEO: विद्यार्थिनीची रोडरोमिओनं काढली छेड; स्थानिकांनी केली धुलाई)

दिवाकरच्या मोबाइलमध्ये सापडले अनाकलयीन कोडवर्ड्स

घरात सापडलेल्या चिठ्ठीत "आवर सन विल शाईन अगेन', "पिंजऱ्यातील ब्लॅक पॅंथर फ्री झाला, आता कसल्याच बंधनात राहिला नाही,' "द एंड' असा मजकूर आणि आणखी काही कोड्स त्यांच्या मोबाइलमध्ये पोलिसांना आढळले आहेत. त्याच्या व्हॉट्‌सअॅप आणि फेसबुक डीपीलाही मोबाइल गेममधील 'ब्लॅक पॅंथर' या पात्राचा फोटो होता. पुढील चौकशीसाठी पोलिसांनी त्याचा मोबाइलही जप्त केला आहे.

(पाहा :SPECIAL REPORT: युतीच्या वाटेवर कोण? आघाडीसाठी धोक्याची घंटा)

माळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर

पेरणेफाटा येथे दिवाकरच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, दरम्यान, संतोषचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले आहे.

जीवघेणे मोबाइल गेम्स

शहरी भागातील तरुण पिढी सध्या ब्लू व्हेल आणि अन्य धोकादायक गेम्सच्या विळख्यात अडकली आहे. आतापर्यंत अनेक लहान मुलांचा या गेम्समुळे बळी गेला आहे.

नवी मुंबईत राष्ट्रवादीला खिंडार; 13 नगरसेवक आणि पदाधिकारी भाजपच्या वाटेवर?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2019 12:05 PM IST

ताज्या बातम्या