खेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार

बिबवेवाडी येथील १४ वर्षांच्या मुलीला खेळण्याचे निमित्त करुन घरी नेऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करणाऱ्या तरुणाला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे़.

News18 Lokmat | Updated On: Aug 20, 2018 05:30 PM IST

खेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार

पुणे, 20 ऑगस्ट : बिबवेवाडी येथील १४ वर्षांच्या मुलीला खेळण्याचे निमित्त करुन घरी नेऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करणाऱ्या तरुणाला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे़. वडिलांना मारुन टाकण्याचीही धमकी त्याने या चिमुकलीला दिली होती. संदीप आनंदराव देवताळे (वय ४०) असे त्याचे नाव आहे़. हा प्रकार लक्षात येताच मुलीच्या आईने पोलिसांकडे फिर्याद दाखल केली होती.

बिबेवाडीत राहणारे देवताळे याच्या घरी हा प्रकार १७ नोव्हेंबर २०१७ पासून वेळोवेळी घडला आहे़. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप देवताळे याच्या घरी कोणी नसताना त्याने या अल्पवयीन मुलीला खेळण्याचे निमित्त करुन घरी नेले़ आणि तिच्यावर अत्याचार केले़. तू हे कोणाला सांगितलं तर तुझ्या वडिलांना मारुन टाकेन अशी धमकीही त्याने मुलीला दिली होती.

मुलीच्या संपर्कात राहण्यासाठी त्याने तीला स्वत:कडील एक मोबाईल आणि सिमकार्डही आणि थोडे पैसेही दिले़ होते. त्यानंतर त्यांने वेळोवेळी या मुलीला धमकी देऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले़. ही बाब मुलीच्या आईला समजताच तीने बिबेवाडी पोलिसांकडे धाव घेतली आणि संदीप देवताळे विरूद्ध फिर्याद दिली. पोलिसांनी त्याला अटक केली असून, पोलीस उपनिरीक्षक एस़ एस़ सुतार अधिक तपास करीत आहेत़.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 20, 2018 05:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close