News18 Lokmat

मंडळाने डीजेच्या तालावर मिरवणुकीचा मार्ग बदलला आणि...

फर्ग्युसन कॉलेज मार्गावर डीजे लावून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पुण्याती एका गणेश मंडळाच्या 10 पदाधिकाऱ्यांना डेक्कन पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.

News18 Lokmat | Updated On: Sep 20, 2018 11:04 PM IST

मंडळाने डीजेच्या तालावर मिरवणुकीचा मार्ग बदलला आणि...

पुणे, 20 सप्टेंबर : विसर्जन मिरवणूकीसाठी ठरवून दिलेल्या फर्ग्युसन कॉलेज मार्गावर डीजे लावून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पुण्याती एका गणेश मंडळाच्या 10 पदाधिकाऱ्यांना डेक्कन पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. बुधवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला.

सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, बुधवारी रात्री फर्ग्युसन कॉलेज रोडवर बाणेर येथील एका कंपनीच्या गणपतीची ही विसर्जन मिरवणूक होती. गणपती मूतीर्ची ट्रॅक्टरवर ठेऊन विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत एका टेम्पोमध्ये डीजेही लावण्यात आला होता. तसेच सोबत ५० वादकांचे ढोलताशा पथक देखील मार्गक्रमण करीत होते.

कंपनीचा गणपती असल्यामुळे या मिरवणुकीत कंपनीचे कामगार मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले होते. दरम्यान, फर्ग्युसन रोडवरील वाहतुकीचा या मिवरणुकीमुळे खोळंबा झाल. डीजेचा आवाज आणि ऐनवेळी मिरवणूकीसाठी दिलेला मार्ग बदलल्याचे पोलिसांतर्फे देण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. डीजेचा प्रचंड आवाज करत ज्ञानेश्वर पादुका चौकाकडून उलट दिशेने ही मिरवणूक काढण्यात आली असल्यामुळे आदेशाचा भंग झाल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी मंडळाच्या दहा पदाधिकाऱ्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. पोलिस अधीक तपास करीत आहेत.

 VIDEO: लता मंगेशकरांच्या घरचा गणपती पाहिलात का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 20, 2018 11:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...