पुण्यात चोरांचा ATMवर डल्ला; 30 लाखांची रोकड लंपास

पुण्यातील यवत येथे एटीएमवर दरोडा टाकत चोरट्यांनी 30 लाखांची रोकड लंपास केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 23, 2019 02:52 PM IST

पुण्यात चोरांचा ATMवर डल्ला; 30 लाखांची रोकड लंपास

पुणे, 23 जून : राज्यात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढताना दिसत आहेत. सांगली, नाशिक येथे बँकांवर दरोडा टाकल्यानंतर पुण्यातील ATMमधून चोरांनी तब्बल 30 लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे. पुणे जिल्ह्यातील यवत येथे शनिवारी ही घटना घडली आहे. चोरट्यांनी ATM फोडून त्यातून तब्बल 30 लाखांची रोकड लंपास केली आहे. ही सारी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दरम्यान, चोरट्यांचा माग घेण्यासाठी पोलिसांनी 4 तुकड्या या चोरांच्या शोधासाठी रवाना केल्या आहेत. राज्यात दिवसाढवळ्या चोरीच्या घटना या वाढताना दिसत आहेत.

चोरांनी आता बँक आणि ATMला लक्ष्य केलं आहे.

नाशिकमध्ये दरोडा

राज्यात बँकांवर दरोडा टाकण्याच्या घटना देखील दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. कारण, यापूर्वी नाशिकमध्ये उंटवाडीतील परिसरात मुथूट फायनान्सच्या कार्यालयावर गेल्या आठवड्यात दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला होता. चार सशस्त्र दरोडेखोरांनी हा दरोडा टाकत बँकेत गोळीबारही केला होता. या गोळीबारात ऑडिटरचा मृत्यू झाला होता तर तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले होते.

सांगलीत देखील दरोडा

दरम्यान, सांगलीमध्ये देखील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची 25 लाखांची रोकड लुटली होती. तासगाव - विसापूर रस्त्यावर त्यांनी कॅश घेऊन जाणाऱ्या बँकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये मिरची पूड फेकत कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती.

VIDEO: 'इंद्रायणी' झाली दूषित, ग्रामस्थ म्हणाले पाणी पिऊ नका!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: ATM
First Published: Jun 23, 2019 02:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close