चंद्रकांत फुंदे, (प्रतिनिधी) पुणे, 18 जुलै: पुणे जिल्ह्यातील मावळ-मुळशी खोऱ्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने भातलावणीच्या कामाला चांगलाच वेग आला आहे. विशेष म्हणजे ही भातलावणी खास आधुनिक दोरी पद्धतीने केली जाते. त्यामुळे हौशी पुणेकर सुट्टीच्या दिवशी भातलावणीचा आनंद लुटताना दिसत आहेत. पाहुयात भातलाववणीचा हा नवा मुळशी पॅटर्न.