पुणे: अॅसिड हल्ला आणि गोळीबार प्रकरणात धक्कादायक खुलासा

पुण्यातील अॅसिड हल्ला आणि गोळीबार प्रकरणात धक्कादायक खुलासा पुणे पोलिसांनी बुधवारी केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 17, 2019 10:03 PM IST

पुणे: अॅसिड हल्ला आणि गोळीबार प्रकरणात धक्कादायक खुलासा

पुणे, 17 एप्रिल: पुण्यातील अॅसिड हल्ला आणि गोळीबार प्रकरणात धक्कादायक खुलासा पुणे पोलिसांनी बुधवारी केला आहे. या हल्ल्यात रोहितसह आई आणि कुटुंबच मारेकऱ्याचे लक्ष होते. सिद्धराम कलशेट्टीच्या हातात गावठी कट्टा आणि बॅगेत दोन कोयते आणि दोन चाकू सापडलेत. मारेकरी थोरात कुटुंबियांना ओळखत होत. मारेकऱ्यानं हत्यारासह पूर्ण तयारीने हल्ला केला होता. त्यामुळे संपूर्ण कुटुंबच लक्ष असल्याचं पोलीस उपायुक्त बच्चनसिंह यांनी सांगितले. त्याचबरोबर गेल्या दहा दिवसांपासून कलशेट्टी घरी नव्हता, असेही बच्चनसिंह यांनी सांगितले.

या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आला आहे. दरम्यान रोहितच्या पाठीतून गोळी काढण्यात आली असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या हल्ल्यात कलशेट्टीला अजून कोण मदत करत होते, अजून कोणी साथीदार आहे का, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

कशामुळे झाला हल्ला

ही घटना अनैतिक संबंधातून हा प्रकार घडल्याचे वाटत होते. पण रोहितची आई आणि आरोपीची फेसबुकवळ ओळख झाली होती. आरोपीने अश्लील मेसेज पाठवल्यामुळे रोहितच्या आईने पोलिसात तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी सिद्धरामला अटक देखील केली होती. या गोष्टीचा राग मनात ठेवून त्याने हे कृत्य केल्याचे बच्चनसिंह यांनी सांगितले.

काय झाले होते

Loading...

सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात मंगळवारी रात्री अ‍ॅसिड हल्ला आणि हल्लेखोराच्या आत्महत्येची थरारक घटना घडली होती. हल्लेखोराने आधी एका तरुणावर अ‍ॅसिड फेकले आणि पोलिसांवर गोळीबार करून पळ काढला. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. टिळक रोडवरील बादशाही बिल्डिंगच्या परिसरात ही घटना घडली होती. रोहित खरात हा तरूण आपल्या मैत्रिणीसोबत बोलत उभा होता. तेव्हा कलशेट्टी नावाच्या हल्लेखोराने रोहितवर अ‍ॅसिड फेकले.

त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. परंतु, हल्लेखोराने पोलिसांवरही गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर हा नजीकच्या एका इमारतीत शिरला. पोलीस आणि हल्लेखोरामध्ये जवळपास 2 तास धुमश्चक्री उडाली होती. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवानही पोहोचले. तब्बल दोन तासांच्या धुमश्चक्रीनंतर त्याने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता तो अपयशी ठरला. त्यानंतर त्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला होता.


SPECIAL REPORT : विकासाचा अजेंडा आता जातीवर घसरला का?


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 17, 2019 10:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...