पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात, 3 मित्रांना ट्रकनं चिरडलं

पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात, 3 मित्रांना ट्रकनं चिरडलं

पुणे-सातारा महामार्गावर शिवापूर फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे.

  • Share this:

पुणे, 23 जुलै : पुणे-सातारा महामार्गावर शिवापूर फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे. दुचाकी आणि ट्रकच्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. काल (22 जुलै) रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. मृत्युमुखी पडलेले सर्वजण तळजाई परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

(पाहा : SPECIAL REOPRT: गुन्हेगारांसोबत आता नागपूर पोलिसांवर डुक्कर पकडण्याची वेळ)

मित्राच्या वाढदिवशी काळाचा घाला

आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करायला तळजाई टेकडीवर हे तीन तरूण गेले होते. यानंतर हे तिघंही शिवापूर येथे दर्ग्याच्या दर्शनाला निघाले. प्रवासादरम्यान त्यांची दुचाकी शिवापूर फाट्याजवळ आल्यानंतर हा अपघात घडला. कोंढणपूरजवळ या तिघांनाही ट्रकनं चिरडलं. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला.

(पाहा :पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, 9 जणांचा जागीच मृत्यू)

दरम्यान, 20 जुलै रोजी महाराष्ट्रातही भीषण अपघात झाला होता.  पुणे-सोलापूर महामार्गावर कदम वाक वस्ती ग्रामपंचायतीसमोर कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. यात पुण्यातील 9 महाविद्यालयीन विद्यार्थी मृत्युमुखी पडले.  वीक एंडनिमित्त सर्वजण पावसाळी पिकनिकसाठी रायगडवर निघाले होते. यावेळी काळानं त्यांच्यावर घाला घातला. कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती आहे.

(पाहा :VIDEO: भिवंडीत भीषण आग; 7 गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी)

दोन तरुणींमध्ये फ्री स्टाईलनं तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 23, 2019 08:51 AM IST

ताज्या बातम्या