पुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू

समर कॅम्पसाठी आलेली ३ मुलं धरणात बुडाल्याची घटना मुळशी तालुक्यात घडलीय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 26, 2018 04:08 PM IST

पुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू

पुणे, 25 एप्रिल : पुणे जिल्ह्यातल्या मुळशीतील कातरखडक धरणात बुडालेल्या तीनही मुलांचे मृतदेह सापडलेत. त्यामुळे एनडीआरएफनेही आपलं शोधकार्य आता संपवलंय.समर कॅम्पसाठी आलेली ३ मुलं धरणात बुडाल्याची घटना मुळशी तालुक्यात घडलीय.

चेन्नईतील ईसीएस मॅट्रिकलेशन स्कूलची १३ ते १५ वयोगटातील २० मुलं मुळशीतील जॅकलीन स्कूलमध्ये समर कॅम्पसाठी आली आहेत. आज त्यांच्या कॅम्पचा पहिलाच दिवस होता. संध्याकाळच्या वेळी ३ मुलं खातरखडक धरणाच्या पाण्यात गेली. मात्र, त्यांना पाण्याबाहेर पडता आलं नाही. रात्रभर शोधकार्य चालू होतं. आज दुपारी ते थांबवण्यात आलंय.

दानिश राजा, संतोष के आणि सर्वांना अशी बुडालेल्या मुलांची नावं आहेत. त्यांचा पाण्यात शोध घेतला असता दानिशचा मृतदेह सापडला. उद्या सकाळी शोधकार्य पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. उन्हाळी किंवा सुट्टीतील शिबिरांमधील सुरक्षिततेचा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा समोर आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 25, 2018 11:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...