26 डिसेंबर : २०१८ साल साखरेसाठी अडचणीचं असू शकतं, असं भाकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्तवलंय. पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात उसाचं विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे साखरेच्या किमती घसरू शकतात, अशी भीतीही शरद पवारांनी वर्तवली.
पुण्याजवळच्या मांजरीमध्ये वसंतदादा शुगर इंस्टिट्यूटच्या ४१व्या सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी शरद पवारांनी साखर उत्पादकांना इशारा दिला. २०१८ साल साखरेसाठी अडचणीचं असू शकतं. इतर देशातून साखर आयातही केली जाऊ शकते. तसं झालं तर दर आणखी पडतील, असं पवार म्हणाले.
यामागचं कारणही पवारांनी समजवून सांगितलं. भारत जागतिक बाजारात साखर विकतो. पण जागतिक व्यापारी समुदायाची ही अपेक्षा असते की भारतानं आपली बाजारपेठही खुली करावी. त्यामुळे काही प्रमाणात साखर आयात केली जाऊ शकते, असं ते म्हणाले.
ऊसतोडणीचा खर्च वाढण्यावरही पवारांनी चिंता व्यक्त केली. सरकारनं आता ऊसतोडणीसाठी अंतर हा निकष लावलाय, तो योग्य नसल्याचं पवार म्हणाले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा