News18 Lokmat

मित्रांनी बळजबरीने दारू पाजून तरुणीवर केला सामूहिक बलात्कार

पिडीत तरुणीच्या असाहयतेचा फायदा घेऊन या नराधमांनी पाशवी कृत्य केलं. पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

News18 Lokmat | Updated On: May 27, 2019 08:44 PM IST

मित्रांनी बळजबरीने दारू पाजून तरुणीवर केला सामूहिक  बलात्कार

पुणे 27 मे : मित्र आजारी आहे त्याला तुला भेटायचे आहे, असं सांगत दोन नराधमांनी एका तरुणीवर बलात्कार केला. ही तरुणी विवाहीत असून वर्षभरापूर्वी तिच्या नवऱ्याचं निधन झालं होतं. याचा फायदा घेत ओळखी करून बलात्कार केल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.

पिडीत तरुणी ही 20 वर्षांची आहे. तिला एक लहान मुलगाही आहे. पतीच्या निधनानंतर ती माहेरी आईकडे राहायला आली होती. तिची ओळख कृष्णा जाधव याच्याशी झाली. कृष्णा हा रिक्क्षा चालवतो. घटनेत्या दिवशी कृष्णा आणि त्याचा मित्र अक्षय चव्हाण हा या तरुणीकडे आला होता. एक मित्र आजारी आहे त्याला भेटायला चल असं त्यांनी पिडीत तरुणीला सांगितलं.

पिडीत तरुणी आणि कृष्णाची ओळख असल्याने ती त्यांच्यासोबत गेली. पतीच्या निधनानंतर कृष्णा हा तिला अनेकदा मदतही करायचा. त्यामुळे त्यांची चांगली ओळख होती. याच ओळखीचा फायदा त्याने घेतला आणि आपल्या मित्रालाही यात सहभागी करून घेतलं.

या दोघांनी तिला एका ओसाड टेकडीवर नेलं आणि बळजबरीने दारु पाजली आणि बलात्कार केला अशी तक्रार पिडीत तरुणीने पोलिसांकडे दाखल केलीय. या तक्रारीवरून पोलिसांनी कृष्णा आणि अक्षय या दोन आरोपींना अटक केलीय. या दोघांविरुद्ध पोलिसांनी सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलीस आरोपींची कसून चौकशी करण्यात येत असून त्यांनी इतर काही गुन्हे केले आहेत काय याचीही चौकशी करत आहेत. या चौकशीतून आणखी काही गुन्हे उघडकीस येऊ शकतात अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.

Loading...बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: gang rape
First Published: May 27, 2019 08:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...