S M L

पुणे मेट्रो प्रकल्पासाठी केंद्राकडून 1300 कोटी मंजूर

पुण्यातील शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोसाठी केंद्र सरकारने व्हायेबिलिटी गॅप फंडिंग म्हणून 1300 कोटी रुपये मंजूर केले आहे.

Sachin Salve | Updated On: Mar 9, 2018 07:53 PM IST

पुणे मेट्रो प्रकल्पासाठी केंद्राकडून 1300 कोटी मंजूर

 9 मार्च : पुण्यातील शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोसाठी केंद्र सरकारने व्हायेबिलिटी गॅप फंडिंग म्हणून 1300 कोटी रुपये मंजूर केले आहे.  अर्थसहाय्य्य मंजूर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले आहेत.

शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो रेल्वे प्रकल्पाची सार्वजनिक खासगी सहभागाने संकल्पन करा, बांधा, आर्थिक पुरवठा करा, वापरा आणि हस्तांतरित करा (DBFOT) या तत्त्वावर उभारणी करण्यात येत आहे. पुणे महानगर प्रदेश‍ विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) त्याची अंमलबजावणी करण्यास अलीकडेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. या मेट्रो मार्गाची लांबी 23.3 कि.मी. राहणार असून या प्रकल्पाचा एकूण खर्च  8 हजार 313 कोटी रुपये आहे. केंद्राकडून मिळणाऱ्या 1300 कोटी रुपये निधीमुळे आता या प्रकल्पाला आणखी गती मिळणार असून पुणेकरांचे मेट्रोचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. केंद्र सरकारच्या या मोलाच्या मदतीबद्दल मुख्यमंत्र्यांनी विशेष आभार मानले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 9, 2018 07:53 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close