अंबाबाईच्या गाभाऱ्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्याला पुजाऱ्यांचा विरोध

अंबाबाई मंदिरातल्या मुख्य गाभाऱ्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती मार्फत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत पण या कॅमेराना पुजाऱ्यांनी विरोध केलाय आणि हे कॅमेरे बंद पाडण्याचाही प्रयत्न केला

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 27, 2017 07:13 PM IST

अंबाबाईच्या गाभाऱ्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्याला पुजाऱ्यांचा विरोध

27 आॅक्टोबर :  कोल्हापूरमध्ये करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मंदिरात पुजारी हटाव आंदोलन सुरू असतानाच आता पुन्हा एक नवा वाद निर्माण झालाय. मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे नको अशी भूमिका पुजाऱ्यांनी घेतलीय.

अंबाबाईच्या मंदिरातले पुजारी आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती यांच्यात नवा वाद उफाळलाय. अंबाबाई मंदिरातल्या मुख्य गाभाऱ्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती मार्फत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत पण या कॅमेराना पुजाऱ्यांनी विरोध केलाय आणि हे कॅमेरे बंद पाडण्याचाही प्रयत्न केला. शिवाय गाभऱ्यावर आमची मालकी असल्याचं निवेदन देवस्थान समितीला देत देवस्थान समितीने बेकायदेशीर रित्या हे कृत्य केल्याचा आरोप पुजाऱ्यांनी केलाय. तर गाभाऱ्याच्या चाव्या आमच्या हातात आहेत असा इशाराही दिला.

त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितिचे अध्यक्ष महेश जाधव यांनी तातडीने पुजाऱ्यांची बैठक बोलावली  या बैठकीत पुजारी कॅमेरे हटवण्याबाबत आक्रमक झाले होते.

मात्र देवस्थान समितीनेही आक्रमक भूमिका घेत कॅमेरे तसंच राहतील ही भूमिका घेतली तसंच कॅमेरे बंद केल्यामुळे सरकारी कामात अडथळा आणला म्हणून पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती महेश जाधव यांनी दिली.

तसंच पुजारी आपल्या म्हणण्यावर जर ठाम राहिले तर प्रसंगी देवीच्या पूजेचे सगळे अधिकार देवस्थान समितीकडे राखून ठेवून देवस्थान समिती पूजा अर्चा करेल असा इशाराही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 27, 2017 07:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...