पुणे, 08 डिसेंबर: पुण्यात एका मुलानेच आईची मारहाण आणि शिवीगाळ करून हत्या केल्याची घटना घडली आहे. मुलानेच आपल्या आईची हत्या मालमत्तेसाठी त्याने केल्याची माहिती मिळाली आहे.
अलंकार पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. अरूणा मनोहर सपकाळ (70) असं मयत व्यक्तीचं नाव आहे. त्यांचा मुलगा आनंद मनोहर सपकाळ(43) यानेच आईचा खून केला आहे. काल रात्री 11.30च्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवीगाळ आणि मारहाण करून त्याने आईचा खून केला आहे. आईला मालमत्तेची कागदपत्रं तो मागत होता. तो आपल्या आईला रोज मारहाण करायचा अशी माहिती त्याच्या बहिणीने दिली आहे.
दोन दिवसांपूर्वी शनिवारवाडा परिसरातही अशीच घटना घडली होती. मुलानेच आपल्या आई आणि वडिल दोघांचा ही खून केला होता. या दोन्ही घटनांमुळे पुण्यात खळबळ माजली आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस अधिक तपास घेत आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा