अखेर माज उतरला, दारुच्या नशेत कार चालविणाऱ्या PSIला गावकऱ्यांचा चोप

अखेर माज उतरला, दारुच्या नशेत कार चालविणाऱ्या PSIला गावकऱ्यांचा चोप

दारुच्या नशेत असलेल्या PSIने तीन दुचाकींना धडक दिली. त्याच पाच जण जखमी झाले.

  • Share this:

लातूर 28 मे : ज्या पोलिसांनी नागरिकांचं रक्षण करणं अपेक्षीत आहे. मात्र लातूर जिल्ह्यातल्या एका पोलीस अधिकाऱ्याने दारुच्या नशेत कार चालवत पाच जणांना जखमी केल्याची धक्कादायक घटना लातूर जवळच्या चाकूर इथं घडलीय. PSI संतोष गीते असं या वादग्रस्त अधिकाऱ्याचं नाव असून वरिष्ठांनी त्याला पाठिशी घातल्याने त्याचा माज वाढल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

लातूर जिल्ह्यतल्या चाकूर पोलिस ठाण्याचे PSI संतोष गीत्ते हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादात अडकलेले असतात. मात्र वरिष्ठांच्या मेहरबानीमुळे त्यांच्यावर आजवर कार्रवाई झाली नव्हती. मात्र सोमवारी भर दुपारीच PSI गीत्ते आपल्या कारमध्ये दारू पितच नलेगाव येथील ऑउट पोस्ट कडे निघाले होते.

दारुने झिंगाट झालेल्या गीत्ते यांनी रस्त्यावरुन जाणाऱ्या तिन दुचाकी स्वाराना धडक दिली. त्यात 5 जण गंभीर जखमी झाले.  तरीही सुसाट गाडी चालवत पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या PSIला लोकांनी पकड़ून चोप दिला. या घटनेनंतर PSI गीत्तेंना तातडीने निलंबित करण्यात आलं आहे. अशीच कारवाई आधी झाली असती तर पाच जणांचा अपघात झाला नसता अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिलीय.

गीत्ते यांच्या गाडीत दारुच्या बाटल्याही सापडल्या आहेत. भर दिवसा गाडीत दारूची बाटली ठेवत ड्युटी करणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्याचा किती माज होता हे दिसून आलं. या गीत्तेच्या अनेक सुरस कथा या परिसरात सांगतल्या जातात. अनेक तक्रारी करूनही याच्यावर कारवाई का झाली नाही असा सवाल आता नागरिक विचारत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 28, 2019 07:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...