S M L

चंद्रकांत पाटलांच्या निवासस्थानाबाहेर सीमावासियांचं आंदोलन

चंद्रकांत पाटील यांनी बेळगाव जिल्ह्यात केलेल्या कन्नडी भाषेतील भाषणामुळे चांगलाच वाद निर्माण झाला.

Sachin Salve | Updated On: Jan 23, 2018 08:27 PM IST

चंद्रकांत पाटलांच्या निवासस्थानाबाहेर सीमावासियांचं आंदोलन

23 जानेवारी : राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बेळगाव जिल्ह्यात केलेल्या कन्नडी भाषेतील भाषणामुळे चांगलाच वाद निर्माण झाला.  आज कोल्हापुरातल्या चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी सीमावासियांनी आंदोलन केलं.

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बेळगाव जिल्ह्यातल्या गोकाकमध्ये कन्नडमध्ये भाषण केलं,  त्याच बरोबर जन्मलो तर कर्नाटकमध्येच, जन्मावे असंही वक्तव्य थेट कन्नड भाषेतूनच केलं,आणि याचाच निषेध म्हणून आज कोल्हापूरमधल्या चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी सीमावासीयांनी आंदोलन केलं.  पण या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी निवासस्थानी जाऊ दिले नाही त्यामुळे कायम कानडी दडपशाहीला बळी पडणाऱ्या सीमावासियांना आज पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलिसांच्या दडपशाहीला  बळी पडावं लागलं.  त्यामुळे सीमावासियांनी आता न्याय कुणाकडे मागायचा अशी विचारणाही आंदोलनकर्त्यांनी केलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 23, 2018 08:27 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close